कांद्याने गाठली ‘चाळीशी’

August 6, 2013 10:30 PM0 commentsViews: 86

06 ऑगस्ट : किरकोळ बाजारात कांद्याचे दर 35 ते 40 रुपये झालेत. अतिपावसानं कांदा भिजल्याने कांद्याचे भाव वाढलेत असं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याचे घाऊक दर 32 रुपये आहेत. नाशिकच्या घाऊक बाजारात सोमवारी कांद्याचा उच्चांकी दरानं लिलाव झाला. सरासरी 3 हजार रुपये क्विंटल हा सर्वाधिक दर काल फुटला. त्याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारात कांद्यानं चाळिशी गाठलीये. उन्हाळी कांद्याची तूट आणि पोळ कांद्याची प्रतिक्षा यामुळे कांद्याचे भाव वाढत आहेत. मुंबई, ठाण्यात किरकोळ बाजारात कांदा 42 ते 45 रुपये किरकोळ दराने विकला जातोय. राज्यसरकारच्या स्वस्त भाजी विक्री केंद्रावरही कांदा किलोमागे 40 रुपये दराने मिळतोय.

close