‘खाप’पंचायत, वडील मराठीत बोलले म्हणून विवाहितेचा गर्भपात !

August 6, 2013 6:07 PM0 commentsViews: 868

आसिफ मुर्सल, सांगली

03 ऑगस्ट : जातपंचायतीची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चाललीय. मुलीचे वडील गोसावी समाजात बोलल्या जाणार्‍या भाषेत न बोलता मराठीत बोलले म्हणून मुलीला माहेरी पाठवण्याचा आणि तिचा गर्भपात करण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडलाय.

गेल्या तीन वर्षांपासून देविकाच्या आयुष्यात आहेत फक्त अश्रू… तीन वर्षांपूर्वी चेतन मुळेकरशी देविकाचं लग्न झालं. यानंतर देविकाच्या सासरी झालेल्या एका कार्यक्रमात देविकाचे वडील तिचे सासरे मधुकर मुळेकर यांच्याशी गोसावी समाजाच्या भाषेत न बोलता मराठीत बोलले. एवढ्या क्षुल्लक कारणावरून गोसावी जातपंचायतीने त्यांना 80 हजारांचा दंड ठोठावला आणि पैसे भरले नाही म्हणून तिला चक्क माहेरी पाठवलं.

देविकाचे हाल इथेच थांबले नाही. जातपंचायतीने तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडलं. नवर्‍यानं दुसर लग्न केलं. या सगळ्या विरोधात देविकाचे वडील मिरज न्यायालयात गेले. पण, 2 वर्षं होऊनही न्याय मिळालेला नाही. जातपंचायतीच्या या गुंडशाहीला आळा घालण्यासाठी आतातरी ठोस कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

close