अतिवृष्टीमुळे विदर्भात 2 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

August 7, 2013 4:36 PM0 commentsViews: 394

vidharbh rai ntoday07 ऑगस्ट : विदर्भात अतिवृष्टीमुळे दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली धक्कादायक घटना घडलीय. तर एका शेतकर्‍याचा नुकसानीच्या धक्क्यामुळे मृत्यु झालाय असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला. अमरावती जिल्ह्यातल्या सोनुरी तालुक्यातले दिलीप आठवले आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या पन्हाळा इथले भिका राठोड या दोन शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने आत्महत्या केली असल्याचं तिवारी यांचं म्हणणं आहे. तर रामकृष्ण कावळे यांचा पावसामुळे झालेल्या नुकसानीचा धक्का सहन न
झाल्याने मृत्यु झाला असल्याच तिवारी यांनी म्हटलंय. सरकारनं पीडित शेतकर्‍यांना मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

close