सीएट पुरस्कारांचं मुंबईत वितरण

January 27, 2009 4:45 PM0 commentsViews: 1

27 जानेवारी, मुंबईभारतीय क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या सीएट-क्रिकेट पुरस्कारांचं वितरणं हॉटेल ट्रायडेण्टमध्ये करण्यात आलं. या वेळी अशोक मंकंड यांना मरणोत्तर सीएट क्रिकेट जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यंदाच्या देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून मुंबईचा कॅप्टन वसीम जाफरला गौरवण्यात आलं. वर्षातील सर्वोत्कृष्ट बॅटसमन म्हणून चेतेश्वर पुजारा तर सर्वोत्कृष्ट बॉलर म्हणून मुंबईच्या धवल कुलकर्णीची निवड करण्यात आली. 19 वर्षाखालील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मुंबईच्याच सौरव नेत्रावलकरची निवड करण्यात आली.

close