महाराष्ट्रातही 3 कोटींचा चारा घोटाळा

August 7, 2013 8:26 PM1 commentViews: 610

solapur chara scamसुधाकर काश्यप, मुंबई

07 ऑगस्ट : बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही चारा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. सोलापुरातल्या सांगोला तालुक्यात चारा छावण्यांच्या नावाखाली 3 कोटी रुपयांहून जास्तीचा घोटाळा झाल्याचं माहिती अधिकारांतर्गत उघड झालंय. हा घोटाळा उघड करणार्‍या शेतकर्‍यांनी आता थेट मुंबई हायकोर्टातच जनहित याचिका दाखल केली आहे.

सांगोला तालुका हा कायम दुष्काळग्रस्त… इथल्या 103 गावांसाठी राज्य सरकारनं 93 चारा छावण्या सुरू केल्या. त्यात सुमारे 1 लाख जनावरं होती. पण, यापैकी 72 चारा छावण्यांच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचं उघड झालंय.

महाराष्ट्रात चारा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. बिहारमध्ये चारा घोटाळा झाला होता. त्यापेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रात झालाय असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोरख घाडगे यांनी केलाय.

महाराष्ट्रात चारा घोटाळा!
डिसेंबर 2012मध्ये पंढरपूरच्या एसडिओंनी टाकलेल्या धाडीत सर्वप्रथम हा घोटाळा उघड झाला.
– छावण्यात कमी जनावरं होती
– रेकॉर्डवर जनावरं वाढवून दाखवण्यात आली होती
– जनावरांना तरतुदीपेक्षा कमी खाद्य देण्यात येत होतं

यानंतर घाडगे यांनी माहिती अधिकारांतर्गत या घोटाळ्याची माहिती काढली. आणि त्याची तक्रार पोलीस ठाणे, तहसीलदार, जिल्हाधिकारी ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत केली. पण, काहीच उपयोग न झाल्यानं अखेर मुंबई हायकोर्टात धाव घेतली.

राष्ट्रवादीच्या 50 टक्के, शेतकरी कामगार पक्षाच्या 35 टक्के, काँग्रेसच्या 15 टक्के छावण्या आहेत. पक्षाचे कार्यकर्ते जिवंत राहवे आणि भविष्यात निवडणुकीला पैसा भरपूर मिळावा, हे सरकारचं प्रयोजन आहे असं खाडगे म्हणताय.

एसडीओनी 72 पैकी 66 चारा छावण्यांवर दंडात्मक कारवाई केली. पण दोषी असलेल्या इतर 6 चारा छावण्यांवर मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्या सहा चारा छावण्या चालवणार्‍या संस्थांचे संचालक हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मोठे पदाधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. या प्रकरणात पोलीसही कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करत आहेत.

राज्यातल्या इतरही शेकडो चारा छावण्यांमध्ये अशाच प्रकारचा चारा घोटाळा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • rahul bhavsar

    Ata ya netyan kadun ka apeksha karnar..? he tar maytachya talu varche loni sudha khanare…!

close