पिंपळगावावर शोककळा

August 7, 2013 10:36 PM0 commentsViews: 392

07 ऑगस्ट : पूंछमधल्या हल्ल्यात कोल्हापुरातल्या पिंपळगावचे नायक कुंडलिक माने शहीद झाले. त्यांच्या गावात शोककळा पसरलीय. त्यांचं पार्थिव आज रात्री पुणे एअरपोर्टवर आणलं जाईल. त्यानंतर लष्करी वाहनातून ते कोल्हापूरमध्ये आणि नंतर त्यांच्या मूळ गावी पिंपळगावला नेण्यात येईल. त्यांच्या कुटुंबीयांना याबद्दल अजून काहीही माहिती देण्यात आलेली नाही. अतिशय गरीब आणि खडतर परिस्थितीचा सामना करत कुंडलिक माने लष्करी सेवेत रुजू झाले होते. गेल्याच महिन्यात ते सुट्टीसाठी गावी येऊन गेले होते. दरम्यान, भारत सरकारनं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे, असं मत गावकर्‍यांनी व्यक्त केलंय.

close