सुशीलकुमार आणि विजेंदरला पद्मश्री नाही

January 27, 2009 4:50 PM0 commentsViews: 3

27 जानेवारीभारत सरकारतर्फे देण्यात येणार्‍या मानाच्या पद्मश्री पुरस्कारासाठी यंदा चार खेळाडूंची निवड झाली आहे. पण या यादीत ऑलिम्पिक ब्राँझ मेडल विजेत्या सुशील कुमार आणि विजेंदर सिंग यांच्या नावाचा समावेश नाही. या दोघांना वगळल्याबद्दल देशभरातून क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. सुशील कुमारनेही पहिल्यांदाच मीडियाला प्रतिक्रिया देताना सरकारच्या निर्णयामुळे धक्का बसल्याचं म्हटलंय. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणी, टीममधला प्रमुख बॉलर हरभजन सिंग, बिलिअर्ड्समध्ये दोनदा जागतिक चँपियनशिप जिकलेला पंकज अडवानी आणि सीनिअर हॉकीपटू बलबिर सिंग खुल्लर या चार खेळाडूंच्या नावाची मानाच्या पद्मश्री पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली. या चौघांची आंतरराष्ट्रीय स्तरावरची कामगिरी लक्षणीय आहे हे तर खरंच, पण बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडल मिळवून देणार्‍या सुशील कुमार आणि विजेंदर कुमार यांचं नाव या यादीत नाहीए हे बघून क्रीडा फॅन मात्र नाराज झाले. स्वत: सुशील कुमार आणि विजेंदर सिंग यांनाही आपली नाराजी लपवता आली नाही. सरकार अजूनही क्रिकेटलाच झुकतं माप देतं हेच यातून स्पष्ट होतं. अशाने इतर खेळांचा विकास होणार कसा, असा सवाल सुशिल कुमारनं केलाय.. भारताला पहिलं वैयक्तिक गोल्ड मिळवून देणार्‍या अभिनव बिंद्राला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. पण सुशील आणि विजेंदरला मात्र सरकार विसरलं हेच खरं.

close