‘वकिलांनीच दिला होता पळून जाण्याचा सल्ला’

August 7, 2013 10:57 PM0 commentsViews: 403

07 ऑगस्ट : पुण्यातील नयना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरणातील प्रमुख आरोपी योगेश राऊतनं धक्कादायक खुलासा केला. आपल्याला पऴून जाण्याचा सल्ला आपल्या वकिलांनीच दिला होता, असा जबाब आरोपी योगेशनं दिला. 9 सप्टेंबर 2011 रोजी योगेशला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला होता. यानंतर दोन वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता, पण अखेर 31 एप्रिल रोजी त्याला शिर्डीतून अटक करण्यात आली. पऴून जाण्यासाठी आपल्या भावानं आणि मित्रानंही मदत केल्याचं योगेशनं म्हटलंय. या सर्वांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

close