सत्यपाल सिंग यांनी केली वरळी कॅम्पची पाहणी

August 7, 2013 11:03 PM0 commentsViews: 152

satyapal singh07 ऑगस्ट : मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी आज वरळी पोलीस कँम्पला भेट दिली. आणि इथल्या इमारतीची पाहणी केली. वरळी पोलीस कॅम्पमधल्या 9 इमारतींना पोलीस प्रशासानानं धोकायदायक असल्याचं घोषित केलंय. आणि पुनर्विकासासाठी त्यांना घरं खाली करण्याची नोटीस बजावली होती. पण यानंतर इथल्या पोलीस कुटुंबीयांनी आंदोलन केलं होतं. आणि घरं खाली करण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्तांनी भेट दिली. आयुक्त सत्यपाल सिंग यांनी इमारतीची पाहणी केली आणि पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.

close