बीसीसीआय ‘क्लीन बोल्ड’ चौकशी समिती अवैधच !

August 7, 2013 11:09 PM1 commentViews: 58

07 ऑगस्ट : मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती मिळवण्यात बीसीसीआय अपयशी ठरली आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं स्थापन केलेली चौकशी समिती बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलं होतं. त्याविरोधात बीसीसीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. खटल्याचा निकाल लागत नाही तोवर चौकशी समितीचा अहवाल ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयच्या चौकशी समितीने चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरुनाथ मय्यप्पन, राज कुंद्राला क्लीन चीट दिली होती. पण यावर मुंबई हाय कोर्टाने ताशेरे ओढले होते. ही समितीच अवैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं होतं.

 • Sham Dhumal

  क्रिकेटमधिल फिक्सिंगची लिंक देशद्रोही लोकांच्यापर्यंत असूनसुध्दा
  त्या आरोपींना कोण वाचविण्याचा प्रयत्न करत आहे?
  यामध्ये अनेकजनांचा सहभाग असल्यानेच हे प्रकरण दडपण्याचा
  प्रयत्न होताना दिसत आहे. अनेक पुरावे असुनसुध्दा आरोपी निर्दोष
  कसे दाखविले जातात?
  देशद्रोह्यांना मदत करणारे देशद्रोही नाहीत का?

close