राडिया टेप्समधील सभाषणं अतिशय गंभीर :सुप्रीम कोर्ट

August 7, 2013 11:21 PM0 commentsViews: 89

Image suprim_cort_on_cbi4_300x255.jpg07 ऑगस्ट : 2 जी घोटाळा प्रकरणातल्या नीरा राडिया टेप्स प्रकरणी सुप्रीम कोर्टाने या टेप्समधली संभाषणं ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत नोंदवलंय. या टेप्स केवळ 2 जी प्रकरणापुरत्या मर्यादित नसून त्याची व्याप्ती त्यापेक्षा अधिक असल्याचं मतही सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय.

 

रतन टाटा आणि एका एनजीओनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना कोर्टाने हे मत नोंदवलं. सीबीआयनं केवळ टेप्समधल्या 2 जी संदर्भातल्या संभाषणाकडे लक्ष दिलं आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असंही आपलं मत नोंदवलंय. राडिया टेप्समध्ये देशांबाहेरुन चालत असणार्‍या व्यवहारांबद्दल काही संभाषणं होती. ही सगळी माहिती असून देखील गेल्या चार सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले.
 

close