ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांचं निधन

August 8, 2013 1:18 PM0 commentsViews: 126

jayamala shiledar408 ऑगस्ट : नाट्यसंगीतातील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री जयमाला शिलेदार यांचं आज पुण्यात पहाटे निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांनी 16 संगीत नाटकांचं दिग्दर्शन केलं, तर 52 संगीत नाटकांमधून अभिनय केला. संगीत रंगभूमीवर त्यांनी बालगंधर्वाबरोबरही काम केलं.

संगीत सौभद्र, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मृच्छकटिक ही त्यांची गाजलेली नाटकं . पती जयराम शिलेदार यांच्या समवेत संगीत रंगभूमीसाठी त्यांनी मोठं योगदान दिलं. संगीत रंगभूमी जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं.

शिलेदार यांच पार्थिव सकाळी 9 च्या सुमारास दिनानाथ मंगेशकर मधून राहत्या घरी आणण्यात आलं. तिथून काही वेळासाठी बालगंधर्व रंगमंदीर, भरत नाट्य मंदिर, टिळक स्मारक मंदिर इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

close