दहशतवाद्यांना मानवी हक्क मागण्याचा अधिकार नाही : न्यायमूर्ती पसायत

January 27, 2009 4:55 PM0 commentsViews: 73

27 जानेवारी, दिल्लीदहशतवाद्यांना मानवी हक्क मागण्याचा अधिकार नाही. अतिरेकी म्हणजे नरपशूच, असा उल्लेख सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अरिजीत पसायत यांनी एका परिसंवादात केला. निरपराध लोकांना मारणारे मानव असूच शकत नाहीत, असं मतही त्यांनी नोंदवलं. दहशतवाद्यांना मानवी हक्क लागू करण्यापेक्षा त्यांनी प्राणी हक्क लावणंच योग्य ठरेल.दहशतवाद्यांना मानवी हक्काची मागणी करणार्‍या कार्यकर्त्यांचाही न्यायमूतीर्ंनी यावेळी समाचार घेतला. सॉलिसीटर जनरल गूलम वहानवटी यांनीही न्यायमूतीर्ंच्या सुरात सूर मिसळला. कसाबचं वकीलपत्र घ्या असं त्यांना कुणी सुचवलं ते घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

close