हल्ला पाकनेच केला, संरक्षणमंत्र्यांनी चूक सुधारली

August 8, 2013 2:35 PM0 commentsViews: 303

a k antoney08 ऑगस्ट : पाक हल्ल्यावर संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी आपलं वक्तव्य अखेर मागे घेतलंय. या हल्ल्याला पाकिस्तानी लष्करच जबाबदार आहे असं निवेदन अँटनींनी आज संसदेत दिलं. मी संसदेत निवेदन केलं, तेव्हा हाती असलेली माहितीच देणं सरकारवर बंधनकारक होतं. माझं निवेदन त्यावरच आधारित होतं.

त्यानंतर लष्करप्रमुखांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यानुसार हे स्पष्ट झालंय की, हा हल्ला पाकिस्तानी सैनिकांनीच केलाय असा खुलासा अँटनींनी केला.

पूँछमध्ये सिमारेषेवर गोळीबार प्रकरणाचे पडसाद दुसर्‍या दिवशी संसदेत उमटले होते. यावेळी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी निवेदन सादर केलं तेंव्हा नियंत्रण रेषेवरच्या हल्ल्यात पाक सैनिकांच्या वेशात दहशतवादी होते असं निवेदन केलं होतं. त्यामुळे विरोधकांनी एकच हल्ला चढवला.

संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच शिवसेनेनं केली. अखेर आज अँटनींनी आपलं विधान मागे घेतलं. त्यामुळे विरोधकांचं समाधान झालं. पण तेलंगणा आणि इतर विषयांवरून आजही दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला.

close