जवानांवर हल्ला करणारे अतिरेकी-मुंडे

August 8, 2013 6:39 PM0 commentsViews: 1145

08 ऑगस्ट : संरक्षण मंत्री ए के अँटनींनंतर आता भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे पाकिस्तानच्या विधानावरून अडचणीत सापडले आहे. सीमेवर आंतकवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले असं गोपीनाथ मुंडेंनी कोल्हापुरात म्हटलंय. पण हल्ला करणारे पाकिस्तानी सैनिक होते अशी अधिकृत भूमिका भारतीय सैन्याने काल जाहीर केली होती. आश्चर्य म्हणजे अँटनी यांनीही अतिरेक्यांना जबाबदार धरलं होतं. त्यावरून भाजप नेते संसदेत आक्रमक झाले होते. अँटनी पाकिस्तानचा बचाव करत आहेत, असा आरोप भाजपने केला होता. अखेरीस आज अँटनींना घूमजाव करावं लागलं. पण आता मुंडे पाकिस्तानचा बचाव करत नाहीयेत का असा सवाल राष्ट्रवादीने विचारलाय. आणि मुंडेंनी माफी मागावी, अशी मागणी केली.

काय म्हणाले मुंडे?

बिहारमधील चार जवान आणि कोल्हापुरातील एक असे पाच वीर जवान देशासाठी शहीद झाले. पाकिस्तानच्या बॉर्डरवर आंतकवाद्यांनी यांच्यावर हल्ला केला यात ते शहीद झाले.

मुंडेंनी देशाची माफी मागावी -मलिक

भाजपच्या लोकांनी आंतकवाद्यांनी हल्ला केलं असं सांगणं म्हणजे पाकिस्तानी सेनेला क्लीन चिट देणं आहे. आणि त्यानंतर सगळं दुरस्त करण्यात आलं. भाजपमध्ये जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या नंतर गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्यावर कारभार येतो. तेही लोकसभेत आहे. त्यामुळे त्यांचं हे विधान चुकीचं आहे, त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.