‘पाक कलाकारांना काम देऊ नका’

August 8, 2013 7:10 PM1 commentViews: 589

shiva sena 108 ऑगस्ट : पाकिस्तानने सिमारेषेवर केलेल्या गोळीबार प्रकरणी शिवसेना आक्रमक झालीय. शिवसेना चित्रपट सेनेनं पाकिस्तानी हल्ल्याचा निषेधार्थात पाकिस्तानी कलाकारांना यापुढे कोणत्याही कार्यक्रमात काम देऊ नका असा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिला आहे.

हिंदी आणि मराठी निर्मात्यांनी आपल्या प्रोडक्शनमध्ये पाक कलाकारांना कामं देऊ नये असं बांदेकर यांनी म्हटलं आहे. या अगोदरही सेनेनं पाक कलाकारांवर बंदी आणली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या इशार्‍याची खिल्ली उडवलीय. आधी पाक कलाकारांवर बंदी घालायची आणि नंतर त्याच कलाकारांबरोबर बैठक घेऊन बंदी उठवायची, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकनं केलीय्.

  • bhagwat kolse patil

    100% truth

close