वर्ध्यात वना नदीत बोट बुडाल्यानं 5 जणांचा मृत्यू

August 8, 2013 10:46 PM0 commentsViews: 233

vardha08 ऑगस्ट : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं वना नदी पात्रात बोट बुडाल्याने 9 जणांना जलसमाधी मिळालीय. या बोटीत 38 मजूर वाघोलीवरून हिंगणघाटकडे निघाले होते. वना नदीतील खडकावर ही बोट आदळून तिचे तुकडे झाले.

त्यामुळे बोटीमधील सर्व मजूर पाण्यात पडले. यातील यातील 31 मजुरांना वाचवण्यात यश आले. त्यातील 5 जणांचे मृतदेहांचे मिळालेत. जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तर पाच जणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवान पोहचले असून बेपत्ता मजुरांचा शोध घेतला जात आहे.

close