प्रणव मुखर्जी श्रीलंकेला रवाना

January 27, 2009 5:01 PM0 commentsViews: 5

27 जानेवारीपरराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी श्रीलंकेला रवाना झाले आहेत. राजीव गांधी यांच्या हत्येसाठी जबाबदार असणार्‍या लिट्टेप्रमुख प्रभाकरनला ताब्यात देण्याची मागणी भारत करणार काय हे अजून अनिश्चित आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत काहीच प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान, प्रभाकरन कुठे आहे याबाबत काहीच माहिती नसल्याचं श्रीलंकन लष्करानं सांगितलंय. प्रभाकर श्रीलंका सोडून पळाल्याची शक्यता लिट्टेचा राजकीय प्रमुख बी. नोतेसन यानं धुडकावून लावलीय. प्रभाकरन अजूनही लिट्टेच्या लढ्याचं नेतृत्व करत असल्याचं त्यांन सांगितलं.

close