दिल्लीवर हाफिज सईद करू शकतो मोठा हल्ला

August 9, 2013 3:34 PM0 commentsViews: 631

hafiz saied09 ऑगस्ट : 26/11 हल्ल्याचा मास्टर माईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिझ सईद दिल्लीमध्ये हल्ला करू शकतो अशी शक्यता गुप्तचर विभागानं दिली आहे. त्यामुळे नवी दिल्लीमध्ये गुप्तचर विभागानं हाय अलर्ट जारी केलाय. दिल्लीत महत्त्वाच्या इमारतींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर खात्याने या संबंधी दिल्ली पोलिसांना माहिती कळवलीय.

 

हाफिज सईदने 2000 साली कराची इथं घेतलेल्या एका रॅलीत दिल्लीतील लाल किल्ल्यावर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. इतर देशाप्रमाणे भारतातही जिहाद पसरवला पाहिजे असं सईदनं म्हटलं होतं. सईदच्या या धमकीनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तर अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनूसार हाफिजने आज लाहोरमध्ये ईद साजरी केली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावले होते.

 

हाफिज सईदवर अमेरिका सरकारने 10 मिलियन डॉलरचं बक्षीस जाहीर केलंय. सईद हा अमेरिकेच्या हिट लिस्टवर असून अमेरिकेनं लष्कर लक्ष ठेवून आहे. या वर्षाच्या सुरूवातील सईदने न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जगभरात कुणाला कुठेही जाण्याची मुभा आहे. माझ्या नशिबाचा निर्णय अमेरिकेच्या हातात नसून तो खुदाच्या हातात आहे असं म्हटलं होतं.

close