सचिन सूर्यवंशींची सांगलीला बदली

August 9, 2013 4:08 PM5 commentsViews: 1121

Image img_236082_ramkadammnsandthakur_240x180.jpg09 ऑगस्ट : अखेर पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आलीय. सचिन सूर्यवंशी यांना बदलीच्या आदेशानुसार पुढच्या 24 तासांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रात रुजू व्हायचंय.

सूर्यवंशी यांनी वांद्रे वरळी सी-लिंकवर आमदार क्षितीज ठाकूर यांची गाडी अडवली होती. ठाकूर यांच्याकडून वेग मर्यादेचं उल्लंघन झालं होतं असं सूर्यवंशीचं म्हणणं होतं. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर ठाकूर यांनी विधिमंडळात सूर्यवंशींवर हक्कभंग सादर कऱण्याची मागणी केली होती.

त्यावेळी हजर असलेल्या सचिन सूर्यवंशींना क्षितीज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम यांनी बेदम मारहाण केली होती.  पावसाळी अधिवेशनात पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. त्याचबरोबर सूर्यवंशी यांचंही निलंबन मागे घेण्यात आलंय. निलंबनाची कारवाई हटल्यानंतर काही आठवड्यातच त्यांची बदली करण्यात आलीय. त्यांच्या बदली म्हणजे आमदारांनी बदला घेतला अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

 • Sham Dhumal

  जे अधिकारी आपले काम योग्य प्रकारे करत आहेत त्यांना निलंबित
  करणे /त्यांची बदली करणे असे प्रकार हल्ली चालू आहेत.
  कारण असे इमानदार अधिकारी असतील तर ते भ्रष्ट लोकांना
  त्रासदायक वाटतात. म्हणून सत्तेचा दुरुपयोग करुन ह्या अधिकार्‍यांना त्रास
  दिला जातॊ आहे. म्हणून बदलिसाठी पारदर्शी गाईड लाईन असली पाहीजे.

  • dinkar

   ha tuzac kra baba?

 • dinkar

  are ha police ahe ka bhai?

 • Arjun Gaikwad

  कायदा आणि नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वात प्रथम कायदे करणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे यांची आहे ह्यचा विसर या दोघांनाही पडला आहे. आणि हे आपल्याच समाजाचे प्रतिबिंब आहे हे आपले सर्वात मोठे दुर्दैव आहे. विचार करा.

 • abhi.aby

  लाज वाटते आपल्या देशाची. ज्याने कायदा पालन केला त्याला उलटे मारून त्याचीच बदली केली. थोडे दिवस थांबा, आमदार टामदर ला लायकी दाखवण्यात येईल.

close