अजितदादांनी मेटेंना फटकारलं, मेटेंना राष्ट्रवादीकडून समज

August 9, 2013 1:59 PM0 commentsViews: 1074

ajit pawar on mete09 ऑगस्ट : विनायक मेटेंचं बोलणं अतिशय चुकीचं होतं. त्याकरता वरिष्ठ नेत्यांनी बोलावून घेतलं होतं आणि मेटेंना स्पष्ट सुचना दिल्या असून विद्यमान आरक्षित जागांना कोणताही धक्का न लावता, आर्थिक गरिबांना आरक्षण मिळावं ही राष्ट्रवादी काँग्रेसची मराठा आरक्षणावरची भूमिका आहे, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यंत्री अजित पवारांनी दिलं.

 

राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटेंनी राज्य मागासवर्गीय आयोगातील काही सदस्य मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यांना बडतर्फ करा, अशी मागणीच केली होती. मात्र त्याच्या मागणीचा समाचार घेत अजित पवारांनी मेटेंची चांगलीच कानउघडणी केलीय.

close