‘तोच खरा मर्द आहे..’, महिलांसाठी सचिनचा ‘आवाज’

August 9, 2013 1:12 PM0 commentsViews: 1032

09 ऑगस्ट : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा ‘मर्द’ या कॅम्पेनसाठी मराठी कविता सादर केली. महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधांत काव्यात्मक आवाज उठवण्याच्या दृष्टीने दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तर यानं मेन अगेन्स्ट रेप अँड डिस्क्रिमिनेशन ही चळवळ सुरू केलीये. पुरुषांमध्ये महिलांविषयी आदरभावना वाढवणं आणि लैंगिक समानतेचा प्रसार करणं हा या चळवळीचा उद्देश आहे. जावेद अख्तर यांनी मूळ कविता लिहिलीये.या कवितेचं मराठी, तेलुगू, तमिळ आणि पंजाबी या भाषांमध्ये रुपांतर करण्यात आलं. यापैकी मराठी कविता सचिनने सादर केलीय

close