26/11 च्या तपासाचा अहवाल पाकिस्तान दोन दिवसात देणार

January 27, 2009 5:02 PM0 commentsViews: 2

27 जानेवारीमुंबई हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याच्या पुराव्यांचे गठ्ठे भारतानं पाकिस्तानला दिले होते. त्याबाबतच्या तपासाचा अंतरिम अहवाल आज मिळणार होता. पण, त्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आलीय. या पुराव्यांचा तपास करण्यासाठी पाकिस्ताननं तीन सदस्य होते. त्यांना तपासाचा अहवाल देण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली होती. भारतानं दिलेल्या पुराव्यांमध्ये मुंबई हल्ल्याचा पूर्ण तपशील आहे. अतिरेक्यांनी वापरलेली शस्त्रं, सॅटेलाईट फोनवरचं संभाषणही यात आहे. हल्ल्याच्या कटात लष्कर ए तोयबाचा कमांडर झकी-उर-रहमान लख्वी आणि झरार शाह यांच्या सहभागावरही या पुराव्यात भारतानं प्रकाश टाकला आहे.

close