देशभरात ईदचा उत्साह

August 9, 2013 5:50 PM0 commentsViews: 23

eid09 ऑगस्ट : आज देशभरात सगळीकडे ईद उत्साहात साजरी केली जातेय. आज सकाळपासूनच देशातल्या मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केलंय. दरवर्षी दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये ईदला जवळपास 20 हजारांपेक्षाही जास्त मुस्लीम बांधव येतात. नमाज  झाल्यानंतर छोट्या मुलांना वेध लागतात ते ईदीचे…ईदनिमित्त त्यांना मिळणार्‍या खास भेटींचे आणि मग त्यानंतर सगळीकडे ईदनिमित्तच्या खास मेजवानीची धूम सुरू होते.

ईद निमित्ताने राजकीय नेते एकत्र

ईदच्या निमित्तानं राजकीय प्रतिस्पर्धीही आपापले मतभेद दूर ठेवून एकत्रितपणे सणाचा आनंद घेत आहेत. नवी दिल्लीत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि भाजपचे शाहनवाज हुसैन यांनी एकत्र लोकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कोलकात्यामध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर भोपाळमध्ये अभिनेता रझा मुराद आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान हे एकत्र होते. यावेळी रझा मुराद यांनी चौहान यांच्यासमोरच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना शाब्दिक चिमटे काढले.

close