एक पत्र राजसाहेबांना….

August 9, 2013 6:38 PM43 commentsViews: 9453

santosh ganjureराजसाहेब आपली वक्तृत्वशैली असो वा जीवनशैली त्याचे प्रचंड आकर्षण आजच्या तरुणाईला आहे, तर इतरांना कौतुक. मग तो विरोधी पक्षातील असो वा अमराठी!!! अर्थात आम्हीही त्यास अपवाद नाही आहोत. पण ते वैचारिक साम्यतेमुळे. साहेब कोणत्या विषयावर काय बोलतील, कोणावर टीका करतील, कोणाचे कौतुक करतील याचे अचूक अंदाज आम्ही बांधत असू, ते इतके अचूक असत की काही मित्रांना मी भाषणे लिहून देतो की काय अशी शंका येते. पण आता साहेबांची मोहिनी ओसरत चालली आहे, आमचे अंदाजही चुकू लागलेत. जसा पक्षाचा विकास वेगाने झाला तशाच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या, पण त्यांचा भ्रमनिरासच झाला.

समर्थकांसह विरोधकांचेही लक्ष नाशिकवर केंद्रित झालंय, होणारच. कारण नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत आलाय, महापालिकेत सत्ता आहे. पण विकासाची कुठे सुरुवात आहे असे दिसत नाही. लोकांचा भ्रमनिरास होतोय आणि याची आपणास निश्चित जाणीव आहे. वेळोवेळी पुरेसा कालावधी पूर्ण झाला नाही, पूर्ण सत्ता नाही अशी कारणे आपण देत आहात. नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत असताना, महापालिकेत सत्ता असताना आपण अशी कारणे देणे शोभत नाही. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाही हे पटत नाही. कारण विरोधी पक्षातीलही काही आमदार-खासदार आहेत जे सत्तेत नसताना जोमाने काम करत आहेत. मग इतरांना का अडचण यावी. आपण एक-दोन वर्ष पाळणा नाही हलला तर अनेक शंका घ्यायला. अनाहूत सल्ले द्यायला सुरुवात करतो. मग एक वर्षानंतर काही कामांची अपेक्षा करणे निरर्थक नक्कीच नाही. लोकांसाठी स्वत:ची संस्कृती,अस्मिता टिकवण्याबरोबरच विकासही महत्त्वाचा आहे. बायको नुसती सुंदर असून चालत नाही तिला मुलंही व्हायला हवीत ना?

मोदींनी ठेका दिल्याप्रमाणे गुजरातेतून जशा विकासाच्या बातम्या येतात तशाच बातम्या नाशिकमधून येतील अशी आमची भोळी आशा होती. होती अशासाठी की, आता वर्ष उलटून गेले पण तिकडे विशेष काही होतेय याची जराशीही कुणकुण लागत नाहीये. गुजरातेत काय, किती आणि खरंच विकास झालाय हे आम्ही थोडंच पाहिलंय? पण सगळेच उदोउदो करतायत आणि आपण स्वत: गुजरातचा विकास पाहून आला आहात आणि तोंडभरून स्तुतीही केली आहे म्हणजे नक्कीच विकास होतोय असे मानायला हरकत नाही. पण आपल्या नाशिकमधून, महाराष्ट्रातून अशा बातम्या कधी येणार?

 Raj Thackeray blog

आमच्या पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे या शिवसेनेच्या वाघाने, नजरेत भरेल असा कामं करण्याचा सपाटा लावला आहे, तेही विरोधी पक्षातच आहेत आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात!! त्यांची कामं बघून बारामतीकरांना घाम फुटलाय म्हणे. निवडणुकीच्या वेळी आमच्या मातोश्रींनी कोणाला मत देऊ असं विचारलं तर आम्ही रेल्वे इंजिनवर शिक्का मार म्हणालो. माझा पक्ष आहे. शेजारीपाजारी, सगेसोयरे म्हणाले घड्याळ्यावर शिक्का मार आपला पाहुणा आहे. आईने बेधडक धनुष्यबाणावर शिक्का मारला. तोपर्यंत धनुष्यबाणाचा पुरंदरशी संबंध फक्त अनामत रक्कम जप्त होण्याइतपतच होता. यावेळी इतरांची अनामत रक्कम जप्त झाली!! आज आम्हाला आमच्या मातोश्रींचा अभिमान वाटतोय. ती अशिक्षित आहे पण अडाणी नाही.त्यामुळे आपल्याकडे सत्ता नाही, पुरेसा कालावधी मिळाला नाही अशी कारणे आपल्यासारख्या डॅशिंग नेत्याकडून अपेक्षित नाहीत.

आता विधानसभा निवडणूका जवळच आल्यात. काही दिवसांत आपण सभा घ्यायला सुरुवात कराल. पण खरं सांगतो साहेब, सभा ऐकण्याची ती ओढ शिल्लक नाही राहिली. मान्य आहे बरेचशे वैचारिक दिवाळखोर नेते आहेत. त्यांच्यावर आपण टीकाटिप्पणी करता, त्यांची खिल्ली उडवता, नक्कल करता. आम्ही ते शेकडो वेळा पाहिलंय. पुन्हा पुन्हा, पण आता ते पाहून आम्हाला हसू येत नाही. त्या नेत्यांनी सुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही कामं केलीत, काही तजवीज केलीय. याउलट आपल्या नेत्यांची- कार्यकर्त्यांची नावे खंडणी वसुली, खून, मारामारी, बलात्कार अशा अनेक गुन्हेगारी खटल्यांत येतायत आणि आपण सभामधून एकहाती सत्तेची मागणी करताय. जनतेचं राहू दे बाजूला, पण कार्यकर्त्यांचे काय. त्यांना अपेक्षित ऊर्जा मिळालीच नाही, कसं काम करणार ते. सत्तेची पहिली पायरी म्हणून नाशिककडून काही अपेक्षा होत्या पण सर्वांच्या पदरी निराशाच पडलीय. आपल्या टीकेचा, कारणांचा आम्हाला उबग आला आहे. त्यामुळे उद्या कोणीही एखादा टग्या उठून साहेबांना रड्या म्हणेल, आम्हाला ते बिलकूल आवडणार नाही. पण त्याचा विरोध तरी आम्ही कसा करायचा?

posted by- संतोष गांजुरे, मुंबई
 

 • योगेश

  100 टका सही बात ……..

 • Sudarshan Kulkarni

  purn maharashtra dya 5varshat 20,25% kahitri kartilch raj….ashi asha watate.

  • sanjaypatil

   aho char varshat tyanchya tera aamdarani kay kele te paha aadhi………..bhandane maramarya ani dadagiri……………fkt bolbacchan…………..agadi CM la shivya pan dilya ……………

 • rahul

  Ekdum Khar Bollat santosh tuhmi……..

 • Uday Medha Sanjay Pofali

  संतोष गांजुरे, मुंबई
  जय महाराष्ट्र

  माझ्या कडून व माझ्या पक्षाकडून “अपेक्षा असण ” हे स्वाभाविकच आहे.
  कारण तुमचा माझ्या वर विस्वास आहे , बाकीच्यांवर नाही ..

  माझ भाषण किवा त्याचे मुद्दे तुम्हाला अचूक बांधता येत असतीन ,कारण मी
  तुमच्या पैकी एक आहे, मी तुमच्याच भावना बोलतो,निव्वळ AC मध्ये बसून
  आश्वासन नाही देत ..

  जिथे गेल्या सहा दशकापासून ह्या लेच्यापेच्या सरकारने , तुमचा भ्रमनिरास
  केला ,त्यांनी तुम्हाला केवळ आश्वासन दिल..त्याबरोबर
  महागाई,बेरोजगारी,रस्तात खड्डे करून ठेवले..ते मी केवळ एक -दोन वर्षांच्या
  काळात असे चकाचक करू शकतो….

  खड्डे , घोटाळे त्यांनी करून ठेवले मी नाही….
  आणि मोदी प्रमाणे करून दाखवतो ना, किवा त्याहूनही बेहत्तर , पण ते १५
  वर्षापासून सरकार सांभाळतात , गेल्या काही वर्षापासून गुजरात,गुजरात
  होतंय…अगदी पहिल्या वर्ष पासून ” विकास नाही होत..”

  बाळ रांगायला लागला म्हणजे त्याला OLYMPIC ला नाही पाठवत …
  मी माझ्या पक्षाने काय केले किवा काय नाही केले हे जर बघताय ,
  तर कमीत कमी त्यांच्या सारखे “तुमचे वाटोळे “तर नाही केले न ..

  खासदार वेगळ्या पक्षाचा , वरती राज्य सरकार वेगळ ,त्याचं एकमेकाशी पटत
  नाही, तर ते तुमच्या
  राज साहेबांच्या “नाशिक ” ला काय निधी देत असतीन..?

  जर नाशिक च चांगल झाल तर त्यांनी केल अन काहीच नाही झाल तर ” राज ठाकरे ”
  ह्यांनी काही नाही केले …हे योग्य नाही …..

  आजवर विश्वास ठेवला ,
  त्याच हक्कान तुम्ही माझ्यशी नाराज झालात..
  यात गैर काही नाही …
  माझे लोक मला नाही सागणार तर कोणाला आपली व्यथा मांडतील ..

  पुन्हा सागतो . एकदा महाराष्ट्र हातात देवून बघाच ….
  जय महाराष्ट्र ..

  आपला

  मन्स पार्थ

  • Vishal Laxman Hingane

   आमच्या पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे या शिवसेनेच्या वाघाने, नजरेत भरेल असा कामं करण्याचा सपाटा लावला आहे,
   ya vakyache spashtikaran kiva tyala poshak ashi udaharane miltil kay?…purandarcha pani prashna shevati nehamipramane pavsane sodavla.. he lihitana mi avarjun sangen ki mi raj yanna jitake manato titakech vijay bapunna pan ani mi changlya goshtiche kautuk karatana paksh vagire pahat nahi.

 • nikhil

  this is a publicity stunt.. this guy just wants to come in limelight by writing this sh*t , yevdhich prashna vicharaychi saway ahe, tar jya cong ncp ne 60 yrs tumhala pokal kelay tyanche tumhi chatachati karta..? he letter mukhya mantri la lihila asta na tar mi maanla asta.. tula kay hava ahe te sang, ata 4-5 divas tuch news channel var gaajshil.. mala ek prashna padto.. tu hech sagla cong ncp la ka nahi vicharat..? ani i am sure ki tu he sagla publicity saathi kelay, ani je mudde tu upastit kelet te 100% khote ahet.. nashik cha vikas nahi jhala mhane.. 60 varsha adhi suddha kadhi vikas jhala navhta , tevha himmat nahi jhali ka letter lihaychi.? tevha suddha asech prashna va manaaatli virodhachi bhavna tumhi sattadhari pakshasamor tumhi mandhayla havi hoti.. he tumhi kelay yacha babat mi mhanat nahi.. pan je lihila ahes na te re check kar, ugach hindi media,etc chya adhare amchya raj sahebanna badnaam karayla try kelas na tar bagh..!

  • Ashish

   Toh congress-ncp kadun trasla,mhanun tyachi khup apeksha hoti mns shi. Pan mns sudha tich nighali. Asa tyacha bolna ahes.

 • Prakash Jamdhade

  Congress geli 60 varshapasun ya deshat sattewar aahe tyanich ya deshache ghotale ghalun watole kele aahe ekade shara pawar saheb fakt barmatichya rajkarnyancha aani sakhar samratache khishe bhartat pani lokance hakkache pinyache pani palwtat tyabaddal tumhi kahi lihinar nahit ka? RAJSAHEB he maharshtratil lokpriy dhadadiche nate aahet te nashikcha soda pan ya maharshtracha kayapalat nakki karun dakhavtil ashi khamata tyachyat aahe…………tumhi totha vishwas thevlat ajun thoda theva badal ghadnar aani to rajsahebach ghadvinar…………JAI MANASE ……JAI RAJSAEB

 • Prakash Jamdhade

  Congress geli 60 varshapasun ya deshat sattewar aahe tyanich ya deshache ghotale ghalun watole kele aahe ekade shara pawar saheb fakt barmatichya rajkarnyancha aani sakhar samratache khishe bhartat lokanhce hakkache pinyache pani palwtat tyabaddal tumhi kahi lihinar nahit ka? RAJSAHEB he maharshtratil lokpriy dhadadiche nate aahet te nashikcha soda pan ya maharshtracha kayapalat nakki karun dakhavtil ashi khamata tyachyat aahe…………tumhi totha vishwas thevlat ajun thoda theva badal ghadnar aani to rajsahebach ghadvinar…………JAI MANASE ……JAI RAJSAEB

  • sanjaypatil

   prakash fakt raj yanchya aamdarani aajparyant 4 varshat kay kele te dolaspane paha ………aandhale prem karu naka ……………….ha premacha ani vadilkicha salla

 • Prakash Jamdhade

  माझ्या कडून व माझ्या पक्षाकडून “अपेक्षा असण ” हे स्वाभाविकच आहे. कारण तुमचा माझ्या वर विस्वास आहे , बाकीच्यांवर नाही ..

  माझ भाषण किवा त्याचे मुद्दे तुम्हाला अचूक बांधता येत असतीन ,कारण मी तुमच्या पैकी एक आहे, मी तुमच्याच भावना बोलतो,निव्वळ AC मध्ये बसून आश्वासन नाही देत ..

  जिथे गेल्या सहा दशकापासून ह्या लेच्यापेच्या सरकारने , तुमचा भ्रमनिरास केला ,त्यांनी तुम्हाला केवळ आश्वासन दिल..त्याबरोबर महागाई,बेरोजगारी,रस्तात खड्डे करून ठेवले..ते मी केवळ एक -दोन वर्षांच्या काळात असे चकाचक करू शकतो….

  खड्डे , घोटाळे त्यांनी करून ठेवले मी नाही…. आणि मोदी प्रमाणे करून दाखवतो ना, किवा त्याहूनही बेहत्तर , पण ते १५ वर्षापासून सरकार सांभाळतात , गेल्या काही वर्षापासून गुजरात,गुजरात होतंय…अगदी पहिल्या वर्ष पासून ” विकास नाही होत..

  ” बाळ रांगायला लागला म्हणजे त्याला OLYMPIC ला नाही पाठवत … मी माझ्या पक्षाने काय केले किवा काय नाही केले हे जर बघताय , तर कमीत कमी त्यांच्या सारखे “तुमचे वाटोळे “तर नाही केले न ..

  खासदार वेगळ्या पक्षाचा , वरती राज्य सरकार वेगळ ,त्याचं एकमेकाशी पटत नाही, तर ते तुमच्या राज साहेबांच्या “नाशिक ” ला काय निधी देत असतीन..?

  जर नाशिक च चांगल झाल तर त्यांनी केल अन काहीच नाही झाल तर ” राज ठाकरे ” ह्यांनी काही नाही केले …हे योग्य नाही …..

  आजवर विश्वास ठेवला , त्याच हक्कान तुम्ही माझ्यशी नाराज झालात.. यात गैर काही नाही … माझे लोक मला नाही सागणार तर कोणाला आपली व्यथा मांडतील ..

  पुन्हा सागतो . एकदा महाराष्ट्र हातात देवून बघाच ….
  जय महाराष्ट्र ..

  आपला
  अड्मीन
  मन्स पार्थ

  • Rudra Aksha

   mumabit rahun nashik cha v4r karu naka santosh raje…….. nashik che
   lok vede naiyet…. bayko sunder asun chalt nai tila mul jhal aphije
   hech mhanane ahe na tumche…. tumchya iter pakshani tari kuthe kai dive
   lavlet … te tr 60 varshanpasun vanzote mhanun vavrtayet… and MNS
   bayka bdlanara paksha naiye…. and bayko la dosh denya adhi swatachi medical kara…. kai sangav doash tumchyatch asel

   • Dhirendra Mungikar

    you are right rudra

   • Tambe

    aapan fakt oghat vahun gela aahat.

  • sanjaypatil

   aho saheb kumbhmelyasathi 550 kotincha nidhi manjur zalay. dusari gosht nashkat magil pandhara varshe shivasenechi satta hoti, shivaseneche mahapaur dashrath patil kititari karyksham hote……………..changle lihitay tumhi sushikshit vatata pan aandhale prem n karata dolaspane matadan kara sarvanche changle hoil………aho ya raj yanchya aamdarani vidhimandalala kusticha adda ki ho banavila…………sanga he shobhte ka aaplya maharashtrala ,,,,,,,,sant dnyaneshwar tukobanchya maharashtrala …….nashikche soda pan ya char varshat tyanchya kontya aamdarane changle kam kele tumhich tharava ani mg dolasapane matadanala samore ja ……………….jast kahi lihit nahi fakt ekch sangen mitra aandhale prem karnyapeksha dolas pane vichar kara

 • daya rakshe

  60 varsh vicharnare kuthe gele hote…………………

 • Vinod Jadhav

  एकदम बरोबर आहे …
  मुळात मनसे चा पाया कच्चा आहे त्यमुळे त्यावर घर बंधने धोका दायक …. कधीही कोसळेल
  मोदि ने महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये नेले …. मुळात अजून देखील तेथे मुंबई एवधी प्रगती नाही झाली
  जर झाली असावी मग गुजराती मुंबई मध्ये काय करीत आहे ।त्यन्नि त्यांच्या प्रांतामध्ये जावे
  आता पर्यत मराठी माणसाने शिवसेने एकडून अपेक्षा केल्या पण मिल कारखाने युतीच्या काळात बंद झाल्या पडल्या
  आणि त्यावर शॉपिंग मोल उभे केले … राज ठाकरेंना बिहारी युपी चे लोक दिसतात गुजराती दिसत नाही सौथ दिसत नाही
  आज रिलायंस टाटा मध्ये उच्च कोण काम करतो …… का मराठी माणूस शिकलेला नाही का ?
  आधी शिवसेना आणि आता त्याचाच भाऊ मनसे दोघेही सारखे
  एक धर्माचे नावाने तर एक प्रांत आणि मराठीच्या नावाने देशात राज्यात अस्थिरता राबवू पाहत आहेत
  हे येणारा निवडणुकीत नक्कीच कलेल …
  मराठी माणूस हा गुंड बनत चालला आहे … हजारो केसेस अंगावर घेत आहे
  विशेह्स्त तरुण मराठी भरकटला आहे … गुंड गिरीच्या नादात दारू पियू लागला आहे
  शिक्षणाला तिलांजली देवून … स्वताचे वाटोळे करून घेत आहे
  हे कुतेतरी विचार करून बंद होणे गरजेचे
  आणि मनसे नेच या गोष्टीचा विचार भडकावू भाषणे बंद केली पाहिजेत
  तरुणांना योग्य दिशा दिली पाहिजे
  जय भारत

  • Amit Vibhute

   Vinod,
   I appreciate your thoughtfulness about Indian youths diverting from their track however i would drag your attention to your previous post which supports Udayanraje Bhosale. He is the person who indirectly or may be involuntarily supporting goons in entire satara. That i know because i am well aware of Satara with Nagthane being my birthplace.
   And one more thing is a large number of youngsters in satara are taking the path of politics for nothing but the misuse of power which comes with the name of UdayanRaje and ShivendraRaje.
   Still its good to know about you who thinks the same way as me about indian youth.

   • Vinod Jadhav

    Thanks…Dhanyawad….Amit Vibhute….

 • गणेश

  पुरेशी माहिती न घेता टीका करण हे अज्ञानाच लक्षण आहे . ब्लॉग लिहायच्या आधी एकदा तरी वर्तमान पत्र वाचायला हव होतं. आहो महाशय , एका वर्षात जर शहर चकाचक होत असत तर ५ वर्ष कालावधी कशाला दिला असता ??? आणि आमच्या महापौर साहेबांनी केवळ ११ महिन्यामध्ये नाशिक महापालिकेचं सर्व च्या सर्व कर्ज फेडलं ते नाही दिसला तुम्हाला ??

  – राज समर्थक गणेश दाते, मुंबई

 • Suryakant Jadhav

  sahi re……….ekdam jantechya manatal bolalas mitra……..pan kahi Raj thakaraynchya samathkana te samjnar nahi…………..te mhantat ki congress ne kahi kel nahi an amchyakadun hya 5 varshat kay apeksha thevta? tyana ekach vicharaych ahe mala ki, jar as asel tar mag tymchyat an tyanchyat kay farak rahila?

 • गणेश

  ब्लॉग लिहणारे महाशय यांचे राजकीय ज्ञान फारच कच्चे दिसते ! निदान ज्या विषया मधलं कळण्या एवढी आपली बुद्धिमत्ता नाही त्या विषया बद्दल किमान न बोलण्याइतपत तरी समजूतदार पणा दाखवायला हवा होता. केवळ एका वर्षा मध्ये नाशिक च्या महापौरांनी महापालिकेच सर्व कर्ज फेडलं हे आपण विसरला का ?? का जाणून बुजून लिहिलत ?? आणि आपल्या माहिती साठी, नाशिक चे सर्व च्या सर्व रस्ते हे काही मनसे नी बांधलेले नाहीत ! ते मागील १५ – २० वर्षान पासून आहेत ! आणि केवळ त्याला खड्डे पडले म्हणून राज साहेबाना दोष देणे हे खरोखर कमी बुद्धीमत्तेचे लक्षण दिसते ! त्यामुळे पुढच्या वेळी ब्लॉग लिहताना एकदा तरी वर्तमान पत्र वाचत चला !

  राज समर्थक गणेश दाते , मुंबई

 • mukesh

  it is real fact…i agree for santosh..

 • Rudra Aksha

  ata 5 varsha jevha purn hotil tevha hotil…. ts tari shivsena asel kivva rashtravadi asel… or congress asel… te jr 10- 10 varsha sattevr rahun pn nasik che bhale karu shakle nait…. rastravadiche palak mantri astana pn IT park cha khelkhandoba jhalay….. industry development mage padtey.. tevha ekhadya navya pakshala sandhi dili tr kai wait….. shivenechya sattecha kalat jya paan velini godavarichi gatar jhali hoti tya paan veli MNS cha sattet dislya nait……. attach 1 varsha jhalay…. ajun 4 varsh baki ahet….. and purander ch jau dya.. nashik madhe magil 5 varsha shivsena hoti… tyani tari kai vikas kela nashik cha…. na krte pana srevanmadhe asel… pn kontya ekalach bolun kai fayda…? and IMP… BAAI SUNDER ASLI AND TILA MUL JHAL TRCH TI BAYKO MHATLI JANYACHI PRTHA NASHIK MADHE NAI…. KARN KADHI KADHI DOSH PURUSHAN MADHE PN ASU SHAKTO… PURUSH PN NAPUNSAK ASU SHAKTO… TEVHA BAAI LA PAKSHASHI JODU NAKA……. jai maharashtra

 • Vinod Jadhav

  राज ठाकरेंनी ज्याना वाऱ्यावर सोडले
  त्यांना साताराचे राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयन राजे भोसले ह्यानी जेल मधून सोडवले.

  साताऱ्यात झालेल्या आदोलन प्रकरणी राज ठाकरे सह एकूण १८ जणावर गुन्हे दाखल आहे.
  त्यातील बहुतेक युवक २२ – २३ वयोगटातील आहेत.सध्या सहा जणावर न्यायालयात खटला सुरु आहे.

  यापैकी एक कार्यकर्ता ” मयूर सागरे ” याने सांगितले की , राज ठाकरे
  ह्यांच्या साठी आम्ही आंदोलन केले आणि येन दिवाळीच्या दिवशी आम्ही सर्व जण
  तुरुंगात होतो.
  पण आम्हाला तुरुंगातुन सोडवायला कोणताही मनसे चा नेता नाही आला तर साताराचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे आले होते.
  https://www.facebook.com/photo.php?fbid=526269937426417&set=a.141839965869418.31642.100001302465385&type=1&theater

 • Vinod Jadhav

  राज ठाकरेंनी ज्याना वाऱ्यावर सोडले
  त्यांना साताराचे राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयन राजे भोसले ह्यानी जेल मधून सोडवले.

  साताऱ्यात झालेल्या आदोलन प्रकरणी राज ठाकरे सह एकूण १८ जणावर गुन्हे दाखल आहे.
  त्यातील बहुतेक युवक २२ – २३ वयोगटातील आहेत.सध्या सहा जणावर न्यायालयात खटला सुरु आहे.

  यापैकी एक कार्यकर्ता ” मयूर सागरे ” याने सांगितले की , राज ठाकरे
  ह्यांच्या साठी आम्ही आंदोलन केले आणि येन दिवाळीच्या दिवशी आम्ही सर्व जण
  तुरुंगात होतो.
  पण आम्हाला तुरुंगातुन सोडवायला कोणताही मनसे चा नेता नाही आला तर साताराचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे आले होते.
  https://www.facebook.com/photo.php?fbid=526269937426417&set=a.141839965869418.31642.100001302465385&type=1&theater

 • Amey Virkud

  संतोष गांजुरे मुंबई यांना ,
  जय महाराष्ट्र
  आपली माहिती खरच खूप कची आहे.थोडी माहिती घ्या आणी मग बोला.तुझा माहिती साठी खाली जे लिहेले आहे ते वाच.
  राज साहेबांच्या स्वप्नातील गोदापार्क प्रकल्पाचा मार्ग मोकळा
  मिळकतधारकांकडून भूसंपादनाला तत्वत: मंजुरी
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वप्नातील गोदापार्क प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मिळकतधारकांनी भूसंपादनाला तत्वत: मंजुरी दिल्याने हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हं आहेत.

  इतकंच नाही या मंजुरीमुळे जेहान सर्कल ते गंगापूर गावापर्यंतच्या रस्त्याचं ३० मीटरपर्यंत रुंदीकरणही आता शक्य होणार आहे.

  महापौर यतिन वाघ यांनी नुकतीच या मिळकतधारकांची बैठक घेतली. मोबदल्याबरोबरच टीडीआर देण्याच्या अटीवर या मिळकतधारकांनी भुसंपादनाला तत्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे सोमेश्वर घाटापासून ते गंगापूर दरम्यान गोदापार्क पर्यटनस्थळ म्हणुन विकसित करता येईल.

  सुयोजित गार्डनपासून घारपुरे घाटापर्यंतची जमीनही संपादित केली जाणार आहे. तसंच सध्या बारा मीटर रुंद असलेल्या गंगापूर रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यात कुंभमेळ्यादरम्यान शहरातील रस्त्यांवर गर्दी वाढणार असल्याने या रस्त्याचं रुंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

  मिळकतधारकांच्या तत्वत: मंजुरीमुळे हा रस्ता आता ३० मीटर रुंद केला जाणार आहे. हे रुंदीकरण हजारो वाहनधारकांसाठी सोयीचं ठरणार आहे.
  हॆ वाचून तरी तुला आमचे साहेब जे बोलतात ते करतात हे समजेल.आणी आशा करतो माझा post चा reply कराल.

  आपला

  अमेय विरकुड.
  (मनसे कार्यकरता)

 • sanjaypatil

  raj samartak ganesh date saheb mumbait rahun nasikchya varta karta mhanje untavarun shelya rakhnyachach prakar navhe kay? tumche raj yanchyavar prem ahe mhanun tase asel kadachit. pn mi nashik mdhe rahat asalyamule sangto, aho amche hi khup prem hote raj yanchyavar ani vishvas hi, pan vyarth…….. aho sarvajanik mutari mdhe sadhe badalibhar pani pan nahi otale ti dhunyasathi yanchya mahpalikene……aani karj phedle ase mhantana tumhi…….aho dar mahinyala sadesatshe kotichi fakt jakat milaychi mahpalikela…………..shaharachya vikasasathi…..tumhi ekda nashkat yevun pahach mg samjel ki te paise kuthe jatat te ………..dusari gosht mhanje raj pratyekveli nashkat aale ki fakt 2 varshe thamba, saha mahine thamba ase mhantat……….pn tyache mage pan karan ahe ………aho kumbhmelyasathi 550 koticha nidhi milanar ahe na mag keval tyachyavar hat maranyasathi ch hi vat pahane aahe ………….aamhi sushikshit nashikar (arthat sarvach nahi, kahi tumchyasarkhe aandhle prem karnare pan aahet chikkkar} janun ahot sarv goshti………rastyanche kay ghevun basalay ………….tyavar tar khadddyavar khadde ahetach pn pinyache pani …….pathdip………toilet ………footpath …….asha anek samasyanche maherghar ahe nashik……………..devashappath sangto rajsaheb itar kontyahi pudharyahun vegle nahit, tar tyanchya peksha daha patine pudhe ahet lokana gandavinyat………..

 • Ashish

  शब्द सर्व शब्द खरे आहे.संतोष तुम्ही उत्तम प्रकारे गोष्ट बाहेर निदर्शनास. खंडणी वसुली, खून, मारामारी, बलात्कार… त्याच्या सर्व खरे

 • santosh

  mita tu mumbai madhe ac madhe rahto tu la kay mahiti vikas zhala kiva nahi
  janatela mahiti koni kay kel te .

 • Dhirendra Mungikar

  असच एखाद पत्र अजित पवार किंवा राहुल ला पाठवा…कॉंग्रेसचे चमचे तुम्ही आम्हाला नका शिकवू

  • Sandip Bhoi

   धीरेंद्र, अस पत्र त्याना लिहून खरच काही फरक पडणार नाही. मात्र राज साहेब अश्या पत्राची नक्कीच दखळ घेतील. आणि बोले तैसा चाले हे सीद्दधा करून दाखवतील.

 • pravin mumbai

  nashik manapache sumare 450 crore che karj mns ya pakshane fedale ..he karj kuni kelel……??????? 60 varsh rajya krnari congress ani 15 varsh rajya krnari ncp yanni pune ani pimpri chinchwad ch kay kelay jara bagha……..rastyavar khadde …. traffic ….ani mahilanchi suraksha yancha thaiman ghalun thevlay
  aaj ncp ani cong chi maharashtrat satta ahe …aaj ya maharashtrat dushkal berojgari ,asha anek samasya ahet mg ya sarkar kadun he prashn ka nahi sutale ,,ani rahila prashn blog lihinaryacha mumbait rahtos na tar mumbaitil raste bagh kadhitari ani magach tharav untavarun shelya hakavyat ki nako!

 • Dipak Adsule

  ha publicity stunt aahe…

 • Sachin Shinde

  संतोष भाषण छान लिहतोस तुझे
  एक-दोन वर्ष पाळणा नाही हलला तर अनेक शंका घ्यायला. अनाहूत सल्ले द्यायला सुरुवात करतो, आणि बायको नुसती सुंदर असून चालत नाही तिला मुलंही व्हायला हवीत ना? या कौंटुमबिक बाबी आहेत रे नाशिक मध्ये राज साहेबांची सत्ता येवून वर्ष होत नाही तर लोकांनि कुरबुर चालू केली त्या वेळीच राज साहेबांनी सांगितले होते कि ५ वर्षानंतर नाशिक बघा आणि नंतर बोला .

  नाशिक ची सत्ता हि महानार्गर पालिके कडे आहे आणि महा पालीकाकडे निधीचा तुटवडा आहे .
  आणि गेली १५ वर्ष शिवसेनेकडे सत्ता होति सगळे रस्ते काही राज साहेबांनी नाह्ही केलेत आणि
  गुजरात च विकास काही एका वर्षात नाही झाला त्याला पण वेळ लागला .

  पत्र लिहिताना जरा विचार विचार करून लिहा आपण शेवटी लिहिले आहे कि
  उद्या कोणीही एखादा टग्या उठून साहेबांना रड्या म्हणेल, आम्हाला ते बिलकूल आवडणार नाही
  राज साहेबाना रड्या बोलणारा अजून तरी जनामाला आलेला नाही आणि येणार पण नाही

  तुमच्या सारख्या लोकामुलेच मराठी माणूस आज तुटतो आहे हे लक्षात ठेवा आणि शांत विचार करून पक्षाचे चांगले काम करा

  एकदा महाराष्ट्र राज साहेबांच्या हाती द्या मग बघा नाशिक काय महाराष्ट्र पण बदललेला दिसेल.
  जय महाराष्ट्र ।
  जय मनसे ।

 • Sunil Jadhav

  yes santosh tumhi barobar bolalat….
  Raj saheb dushkali bhagala bhet dyayala aale tevha kay kel tyani…
  Gai ani bailala manase cha colour tevda dila…
  mumbai sodun baki maharashtra aahe ki nahi…
  raj saheb Mumbai chya baher pada ani baki Maharashtra kade pan laksh dya…nahitar pawar ani tumachyat kar farak aahe…te baramatit ani tumhi mambait….
  asach jar chalat rahil tar Marathwada ani Vidarbha madhe tumhala GHANTA pan mate milnar nahit….

 • Vishal Laxman Hingane

  विजयराव मी सदर वाक्याचे स्पष्टीकरण व त्यापुष्टर्थ उदाहरण मागितले आपण फक्त तेच वाक्य वेगळ्या
  पद्धतीने सांगितले मी पण पुरंदर तालुक्यातलाच आहे व तेथील राजकीय व सामाजिक घडामोडींची मलापण बर्‍यापैकी माहिती
  आहे. मी वैयक्तिक बापूंबद्दल आकस ठेवून बोलत नाहीये पण ज्याप्रकारे राज साहेब आणि बापू
  यांवर कमेन्ट केली गेलीये त्यानुसार फक्त मला हेच म्हणायचे आहे जे संतोषशेठ राज आणि
  मनसेबद्दल बोलतात तशीच प्रतिक्रिया बाप्पुंबद्दल पुरंदरमध्ये उमटते..

  इथे मी एक आवर्जून 2 गोष्टींचा उल्लेख करेन

  1. आपण जसा चष्मा लावू तसे जग दिसते

  2. शेवटी राजकीय/सामाजिक लोक आंधळ्या लोकांच्या गोष्टीतील हत्तीसारखे असतात, ज्याच्या हातात कान येतो त्याला हत्ती सुपासारखा वाटतो ज्याच्या हाती पाय येतो त्याला हत्ती खांबासारखा वाटतो, ज्याच्या हातात शेपटी येते त्याला हत्ती दोरीसारखा
  वाटतो, ज्याच्या हाती सोंड येते त्याला तो नळीसारखा वाटतो…

  म्हणून मी स्पष्टीकरण मागितले कारण पुरंदरमध्ये नजरेत भरावी अशी कामे दिसत नाहीत तो माझा भ्रम असू शकतो पण मी सुद्धा राजवरील बर्‍याच
  आक्षेपणा उत्तर देऊ शकतो .. माझ्या चष्म्यातून..!

 • BHAUSAHEB KEKAN

  Jara baki Netyana patra lihaycha vichar kara Santosh Saheb!!!! Mag pahu tumcha Rajkiy vishleshan!!!

 • dnyanoba kharat

  आता विधानसभा निवडणूका जवळच आल्यात. काही दिवसांत आपण सभा घ्यायला सुरुवात
  कराल. पण खरं सांगतो साहेब, सभा ऐकण्याची ती ओढ शिल्लक नाही राहिली. मान्य
  आहे बरेचशे वैचारिक दिवाळखोर नेते आहेत. त्यांच्यावर आपण टीकाटिप्पणी करता,
  त्यांची खिल्ली उडवता, नक्कल करता. आम्ही ते शेकडो वेळा पाहिलंय. पुन्हा
  पुन्हा, पण आता ते पाहून आम्हाला हसू येत नाही. त्या नेत्यांनी सुद्धा आपलं
  अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही कामं केलीत, काही तजवीज केलीय. याउलट
  आपल्या नेत्यांची- कार्यकर्त्यांची नावे खंडणी वसुली, खून, मारामारी,
  बलात्कार अशा अनेक गुन्हेगारी खटल्यांत येतायत आणि आपण सभामधून एकहाती
  सत्तेची मागणी करताय. जनतेचं राहू दे बाजूला, पण कार्यकर्त्यांचे काय.
  त्यांना अपेक्षित ऊर्जा मिळालीच नाही, कसं काम करणार ते. सत्तेची पहिली
  पायरी म्हणून नाशिककडून काही अपेक्षा होत्या पण सर्वांच्या पदरी निराशाच
  पडलीय. आपल्या टीकेचा, कारणांचा आम्हाला उबग आला आहे. त्यामुळे उद्या
  कोणीही एखादा टग्या उठून साहेबांना रड्या म्हणेल, आम्हाला ते बिलकूल आवडणार
  नाही.

 • Balaji

  I feel your blog is prejudiced as well as premature in nature. You are not doing 360 degree analysis of the matter. You are praising Modi & Gujrat Model. But do not forget NaMo is enjoying power third time. Developement needs time, it will surely happen only under the leadership of Raj T. What others could not achieve in last 60 years, you are expecting MNS to do the things in 1 year. quite ridiculous. Raj T is the only hope for brighter & better Maharashtra.

 • Mayur Divate

  Santosh ,

  Barobar ahe tuz. Jar mahanagar palika kech kam dakhavayala MNS tayar nasel tar tyani MLA chi kame dakhavavi karan ata term sampatey.

  5 years madhe ek tari exam havich.

  Hope MNS dakhal gheil.

 • Swapnil

  Are Mumbai BMC la, Kalyan KDMC la pan koni tari asach patra liha na.. ayala ya Khaddyat chalun chalun hairan hoyala zalay.. Are Geli 60 Varsha tumachi shiv sena ya don Munciple Corporation var satta ghetey. kay kelay re.. sagalyat shrimat mhanun BMC javal pahile jatey but ek tar as kaam dakhava je ya lokani kelay.. Me Ajj Kalyan East La rahatoy.. yeun Bagha yala chalayala jaga nahi ani mahapaur Kalyan East chi ahe pan ek rasta dhad nahi.. Virodha karayacha mhanun karu naka Raaj sahebanvar.. Apeksha Thavan chukich nahi… ani kon tari bolalay nashik la kumbhamelya sathi nidhi milato pan ekda jaun bagha to ajun milala ahe ke nahi to..

close