ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनल्स सुरू

January 27, 2009 5:04 PM0 commentsViews: 1

27 जानेवारी, सिडनीऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टरफायनल मॅचना आता सुरुवात झाली आहे आणि लवकरच जेतेपदासाठी झगडणारे टॉप चार प्लेअर्स कोण असणार याचं चित्र आता स्पष्ट होईल.ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या क्वार्टर फायनल लढतींना सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या पहिल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये अमेरिकेच्या अँडी रॉडीकनं बाजी मारत सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. सर्बियाच्या नोव्हॅक जॉकोविचनं दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर रॉडीकनं सेमाफायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. आता त्याची गाठ पडणार आहे ती वर्ल्ड नंबर 2 आणि तीन वेळा स्पर्धेचं जेतेपद पटकावलेल्या रॉजर फेडररशी. दुसरीकडे क्वार्टर फायनल लढतीत वर्ल्ड नंबर वन राफेल नदाल आपला टॉप फॉर्म कायम राखत सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. पण त्यासाठी त्याला फ्रान्सच्या गाईल्स सिमोनला नमवावं लागेल. ही मॅच नदालसाठी सोपी नसेल कारण काही महिन्यांपूर्वीच सिमोननं फेडरर आणि नदाल या दोन्ही वर्ल्ड चॅम्पियन्सना धूळ चारली होती. पुरुषांच्या चौथ्या क्वार्टर फायनल लढतीत गेल्यवर्षीचा फायनलिस्ट जो विल्फ्रेड सोंगाचा मुकाबला स्पेनच्या फर्नांडो वेरडोस्काशी होणार आहे. सोंगा जरी ही मॅच जिंकण्यासाठी फेव्हरेट असला तरी वेरडोस्कानं अँडी मरेला ऑस्ट्रेलियन ओपनमधून परत पाठवलयं हे विसरुन चालणार नाही.महिला गटात रशियाच्या व्हेरा झोनेरेव्हानं फ्रान्सच्या मारियन बार्टोलीला नमवत सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये तिची गाठ पडणार आहे ती रशियाच्याच वर्ल्ड नंबर 3 दिनारा साफिनाशी. साफिनानं ऑस्ट्रेलियाच्या येलेना डॉकीकचा पराभव करत सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. महिलांच्या तिसर्‍या क्वार्टर फायनलमध्ये 9 वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणार्‍या सेरेना विल्यम्ससमोर आव्हान असेल ते रशियाच्या स्वेत्लाना कुझनेत्सोव्हाचं. तर दुसरीकडे रशियाच्याच एलेना दिमेंतीएव्हासमोर आव्हान असेल ते जायंट किलर कार्ला सोरेज नोव्हॅरोचं. नोव्हॅरोनं यापूर्वीच व्हिनस विल्यम्सला ऑस्ट्रेलियन ओपनमधून घरी पाठवलं आहे.एकूणच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आपल्या फेव्हरेट प्लेयर्सच्या विजयासाठी फॅन्सनी प्रर्थना करायला सुरुवात केली आहे. पण स्पर्धा कोणीही जिंकली, तरी अंतिम टप्प्यात टेनीस प्रेमींना चांगल्या लढती पहायला मिळणार, हे नक्की.

close