बोट अपघात प्रकणी बोट मालकासह चौघांवर गुन्हा दाखल

August 9, 2013 8:37 PM0 commentsViews: 74

vardha accident09 ऑगस्ट : वर्धातल्या हिंगणघाट येथे झालेल्या बोट अपघात प्रकणी बोट मालकासह चार जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणघाटच्या वाण नदीत दोन बोटी उलटून 38 जण बुडाले होते. त्यात 31 जणांना वाचवण्यात आलंय. तर 5 जणांचा मृत्यू झालाय. दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.

 

बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी पाच बोटींव्दारे शोधकार्य सुरू होतं. पण सायंकाळी हे बचावकार्य थांबवण्यात आलंय. गुरूवारी वना नदीच्या पात्रात खडकावर ही बोट आदळून तिचे तुकडे झाले. त्यामुळे बोटीतले 38 मजूर बुडाले होते. जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

close