‘श्रीसूर्या’चा गंडा,गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास नकार

August 9, 2013 8:52 PM0 commentsViews: 316

09 ऑगस्ट : नागपूरमध्ये दोन वर्षांमध्ये दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवणार्‍या श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीने आता हजारो गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यास नकार दिलाय. नागपूरमध्ये अशा प्रकारे सेबी आणि आरबीआयच्या परवानगीशिवाय जास्त व्याजाचे आमिष दाखवून हजारो लोकांच्या अवैध ठेवी ठेवण्यात येतात, ही बातमी जानेवारी महिन्यात आयबीएन लोकमतने दाखवली होती. आता या कंपनीने ठेवीदारांना पैसे परत द्यायला नकार दिलाय. जवळपास 25,000 मध्यमवर्गीय लोकांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेत. त्यांनी आता पैशांसाठी कंपनीच्या ऑफिसमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे.
श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंटचा गंडा

  • - 21000 रु. भरून श्रीसूर्याचे सदस्यत्व
  • - लोकांना फिक्स डिपॉझिटचा सल्ला
  • - अडीच वर्षांत पैसे दामदुप्पटीचं वचन
  • - सुरुवातीला काही दिवस पैसे दिले नंतर पैसे देण्यास नकार
  • - काहींना पोस्ट डेटेड चेक्सद्वारे पैसे देण्याचं आश्वासन
  • - मात्र आता पैसे देणे पूर्णपणे बंद
close