माजी राष्ट्रपती वेंकटरमण यांचं निधन

January 27, 2009 5:23 PM0 commentsViews: 13

27 जानेवारी, दिल्लीभारताचे माजी राष्ट्रपती आर वेंकटरमण यांचं आज दिल्लीत निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. 1987 ते 1992 या काळात त्यांनी देशाचं राष्ट्रपतीपद भुषवलं. ते भारताचे सातवे राष्ट्रपती होते. त्यापूर्वी 1982- 1987 या काळात ते उपराष्ट्रपती होते. इंदिरा गांधींच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे संरक्षण आणि अर्थखात्याचं मंत्रीपदही भुषवलं होतं. कामगार चळवळीमध्येही त्यांचं योगदान होतं. शिवाय ते स्वातंत्र्यसैनिकही होते.

close