पाकचा पुन्हा भ्याड हल्ला, पूंछमध्ये 10 तास गोळीबार

August 10, 2013 2:58 PM0 commentsViews: 837

Image img_227742_locboradarpakvsindia_240x180.jpg10 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधल्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा फायरिंग केलंय. दुर्गा पोस्टमध्ये दोन भारतीय चौक्यांवर फायरिंग करून पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग केलाय. रात्री साडे दहा वाजता पहिल्यांदा तर देगवारमध्ये पहाटे 2 वाजता फायरिंग करण्यात आली, असं आता उघड होतंय.

 

त्याला भारतीय बाजूनेही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. पाकिस्तानने 10 तासांमध्ये तब्बल 7000 राउंड्स फायर केले. सुदैवानं यात भारताच्या बाजूला कुणीही जखमी झालं नाही. भारतीय जवानांवर पाकिस्तानकडून पाच दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यात पाच भारतीय जवान शहीद झाले होते. आता पुन्हा हल्ला झाल्यानं शस्त्रसंधीचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

close