‘चेन्नई एक्स्प्रेस’सुसाट, ‘फस्ट डे’ला 33 कोटींची कमाई

August 10, 2013 1:39 PM0 commentsViews: 868

cheenai express film10 ऑगस्ट : बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि दीपिकाच्या चेन्नई एक्स्प्रेसवर समीक्षकांनी जरी टीका केली असली. तरी चाहत्यांनी मात्र हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतलाय. पहिल्याच दिवशी तब्बल 33 कोटी रूपये कमवत या सिनेमाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहे.

त्याचबरोबर प्रदर्शनपूर्व सिनेमाचे हक्क यु टीव्हीने विकत घेतले आहे. त्यामुळे या सिनेमाने अगोदरच 6 कोटी 75 लाखांची कमाई करत आतापर्यंतचा बॉलिवूडमधला सर्वाधिक प्रिव्हिव्ह कलेक्शन करणारा सिनेमा म्हणून मान मिळवलाय. यापूर्वी हा रेकॉर्ड आमीर खानच्या थ्री इडिएट्सच्या नावावर होता. त्याचं कलेक्शन 2 कोटी 75 लाख इतकं होतं.

चेन्नई एक्सप्रेस देशभरात तब्बल 3500 स्क्रीन्स आणि परदेशात 700 स्क्रीनवर झळकलाय. हिंदी वगळता इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, अरेबिक, जर्मन, हिब्रू, डच आणि टर्किश अशा 10 भाषांमधून चेन्नई एक्स्प्रेस रिलीज झालाय.

हे पण वाचा

फिल्म रिव्ह्यु : चेन्नई एक्स्प्रेस

मनसेचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ ग्रीन सिग्नल

close