‘गोदावरीचं पाणी आंघोळीसाठीही लायक नाही’

August 10, 2013 2:11 PM0 commentsViews: 303

rajendra singh on godavari10 ऑगस्ट : महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी आता ‘गटार गोदावरी’ झाली. गोदावरीचं प्रदूषित रुप बघून जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह व्यथित झाले. गोदावरी ही नदी राहिली नाही ती आता नाला बनलीय.

त्यासाठीच्या ट्रिटमेंट प्लँटवरील खर्च वाया गेलाय. गोदावरीचं पाणी पिण्यासाठीच काय तर आंघोळीसाठीही लायक राहिलं नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलीय. वसुंधरा फेस्टिव्हलसाठी ते नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी गोदावरीची पाहणी केली.

महापालिकेच्या ट्रिटमेंट प्लॅन्टमधून सोडण्यात येणारं पाणी किती दूषित आहे याचं विदारक चित्र राजेंद्रसिंह यांना पहायला मिळालं. यावेळी गोदावरी गटारीकरणविरोधी मंचांचे कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. एवढी प्रदूषित नदी आपण कुठे पाहिली नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.

close