बलात्कार प्रकरणी दोषींना अवघ्या 5 दिवसात शिक्षा

January 27, 2009 5:27 PM0 commentsViews: 1

27 जानेवारी, चंदीगडभारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एका विक्रमाची नोंद झाली आहे. जर्मन महिलेच्या बलात्कारप्रकरणी चंदीगडमधल्या सेशन्स कोर्टानं 5 जणांना दोषी ठरवलं आहे. प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर केवळ दहा दिवसांत कोर्टानं या खटल्याचा निकाल दिलाय. या महिन्याच्या सतरा तारखेला कोर्टानं खटल्याची सुनावणी दररोज करण्याचा निर्णय घेतला. आरोपी पंकज, मनवीर सिंग जॉली, हरप्रीत सिंग, सोमपाल आणि सुखविंदर सिंग यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा त्यांच्यावर आरोप होता. ही घटना 28 डिसेंबर 2008 रोजी घडली होती. चंदीगडच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधून या आरोपींनी जर्मन महिलेचं अपहरण केलं होतं. आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.

close