राष्ट्रवादीकडून महिन्याभरात लोकसभेचे उमेदवार जाहीर

August 10, 2013 5:50 PM0 commentsViews: 906

sharad pawar pune10 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला आता खर्‍या अर्थाने सुरूवात केलीय. येत्या सोमवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होणार आहे.

या बैठकीत जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल. आणि त्यानंतर या महिन्यात राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार निश्चित करणार असल्याची अनपेक्षित घोषणा आज पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली.

यादी जाहीर झाल्यानंतर त्या पुढच्या दहा दिवसांत ज्या जागा आपल्या लढवायच्या आहे. त्यासाठी प्रमुख सहकार्‍यांना विश्वास घेऊन आपला निर्णय आताच घेण्यास सांगणार असंही पवारांनी सांगितलं.

close