खरा ‘फुंगसुक वांगडु’ शिकवतोय हिमालयातील मुलांना !

August 10, 2013 8:45 PM0 commentsViews: 1242

हलीमा कुरेशी, पुणे

10 ऑगस्ट : वाईल्ड फोटोग्राफीच वेड अनेकांना असतं.पण पुण्यातल्या 26 वर्षीय चिन्मय राणेला हे वेड घेऊन गेलं ते हिमालयातील अतिउंच अशा किब्बर या गावी…रोहतांग पास इथल्या निसर्गात फोटोग्राफी करताना चिन्मय तिथल्या वातावरणात आणि लोकांमधे इतका समरस झाला की त्याने तिथेच स्थायीक होण्याचा निर्णय घेतला. तो नुसताच तिथं स्थायीक झाला नाही तर तो आता तिथल्या मुलांना शिकवतोय सुद्धा…

‘ऑल इज वेल’ म्हणत सगळ्या मुलांना अभ्यासाची गोडी लावणारा ‘थ्री ईडियट्स’ मधला ‘फुंगसुक वांग़डु’ पाहुन आपल्याला अगदीच कौतुक वाटत होतं. पण असंच आयुष्य प्रत्यक्षात जगतोय पुण्याचा चिन्मय राणे. पुण्यात वाढलेल्या- शिकलेल्या चिन्मयला लहानपाणापासूनच वेड होतं ते निसर्गात हिंडण्या- फिरण्याचं. यातूनच फुललं चिन्मयचं वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रेम.. निसर्गभ्रमंती करत करत चिन्मय पोचला रोहतांग पासला हिमालयात किब्बर या गावी.. आणि आता तिथलाच झालाय. आणि फोटोग्राफी करता करता आता तो तिथेच राहुन तिथल्या मुलांना शिकवण्याचं काम करतोय.

पुण्यात ज्या ठिकाणी चिन्मय खेळायच्या त्या गरवारे बालभवनातर्फे नुकताच चिन्मयचा सत्कार करण्यात आला. हे पाहताना त्याच्या आई आणि शिक्षकांचा उर अभिमानाने भरुन आला. खडतर परस्थितीत निसर्ग आणि समाजासाठी काम करणार्‍या चिन्मयच कौतुक सर्वांनाच आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रातच करिअर करायला मिळणं हे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही. चिन्मय मात्र भाग्यवान ठरला. आता तर तो म्ुालांना शिकवण्याचं काम करत सामाजिक भानही दाखवतोय.

close