पुणेकरांच्या शहरात हत्तीणीवर उपासमारीची वेळ

August 10, 2013 9:26 PM0 commentsViews: 279

10 ऑगस्ट : पळून गेलेला मालक आणि माहुताकडे नसलेले पुरेसे पैसे यामुळे पुण्यातल्या पौर्णिमा नावाच्या हत्तीणीवर उपासमारीची वेळ आलीय. आर्थरायटीस, मोतीबिंदू आणि त्याबरोबरच शरीरावर झालेल्या जखमा यामुळे तिला फारसं चालणंही शक्य होत नाही. गेले चार महिने तिचं खाणं पिणं आणि उपचारांची काळजी घेण्यार्‍या प्राणीमित्र संघटनेलाही आता तिचा खर्च उचलणं अवघड होत चाललंय. त्यामुळे आता या हत्तीणीला तातडीने प्राणीसंग्रहालयात नेलं जावं अशी मागणी या संघटनेने केलीय.

close