काँग्रेसचे दिग्गज मंत्री उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

August 10, 2013 9:44 PM0 commentsViews: 1163

Image img_219882_cmongaslpg_240x180.jpg10 ऑगस्ट : राज्यातल्या मंत्रिमंडळातील काही काँग्रेसच्या मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, असं सूचक विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत केलंय.

काँग्रेसचे 17 ठिकाणी खासदार आहेत. आणि मागिल निवडणुकीत नऊ ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला होता त्या ठिकाणाबद्दलची चर्चा झालीय. त्यानंतर राज्यातील मतदार संघाबद्दल निर्णय घेतला जाईल. मात्र यावर अजून चर्चा सुरू असून राष्ट्रवादीबरोबर काही जागांची आदला-बदल करण्यासाठी चर्चा सुरू आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

विशेष म्हणजे अधिकाधिक जागा जिंकून याव्यात यासाठी दिग्गज मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याचा निर्धार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात बोलून दाखवलाय. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्यानं आता खासदारकीसाठी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलंय.

close