पाकची पुन्हा आगळीक, नियंत्रणरेषेवर पुन्हा गोळीबार

August 12, 2013 2:08 PM0 commentsViews: 318

loc

12 ऑगस्ट : पाकिस्तानकडून नियंत्रणरेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. रविवारी रात्री 10 वाजता पाकिस्ताननं पूंछमधल्या देगवारमध्ये तीन भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. विशेष म्हणजे रविवारी दिवसभरातला हा तिसरा हल्ला होता. त्यापूर्वी मेंधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला.

पाकिस्तानी सैन्यानं कनचक या ठिकाणी बीएसएफच्या दोन चौक्यांवर गोळीबार केला होता. त्यात बीएसएफचा एक जवान गंभीररित्या जखमी झाला होता

. तर 5 तारखेला सांबा जिल्ह्यात सीमेपार झालेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता. या अगोदरही पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जवान शहीद झाले होते. मात्र अजूनही केंद्र सरकारकडून कोणताही निर्णय घेतला गेला नाही.

close