किश्तवार: जम्मू-काश्मीरच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

August 12, 2013 2:26 PM1 commentViews: 349

kishtwar12 ऑगस्ट : किश्तवारमधल्या जातीय दंगलीप्रकरणी जम्मू आणि काश्मीरचे गृह राज्यमंत्री सज्जाद अहमद किचलू यांनी राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तो स्वीकारला असून राज्यपालांकडे पाठवण्यात आलाय. त्यापूर्वी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरच्या सरकारकडून अहवाल मागवला होता.

यासंबंधी केंद्रीय गृहराज्यमंत्री आर पी एन सिंह यांनी सांगितलं की, परिस्थिती काबूत यावी यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे. तसंच यासंबंधीचं फुटेज पाहून समाजकंटकांना अटक करण्याच्या सूचनाही राज्य सरकारला देण्यात आल्यात.

तर, राज्य सरकारने या दंगलींची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधल्या किश्तवार शहरात झालेल्या जातीय दंगलीनंतर जम्मू विभागातल्या आठपैकी तीन जिल्ह्यांमधली संचारबंदी हटवण्यात आलीय.

सकाळी दोडा आणि कथुआ या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी हटवण्यात आली. मात्र, तिथं कलम 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश देण्यात आलाय. त्यानंतर उधमपूरमधली संचारबंदीही हटवण्यात आली. उरलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये तणाव अजूनही कायम आहे. त्यामुळे सध्या किश्तवार, जम्मू, राजौरी, सांबा आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी कायम आहे.

  • Rameshwar

    किश्तवाड दंगल झाली आणि सर्व धर्मनिर्पेश लोकांनी सागावयास सुरवात केली कि यात पाकिस्थानाचा हात आहे ,यात दहशद वाडी यांचा हात आहे ,यात फुटीर वाद्यांचा हात आहे काही अक्लीच्या लोकांनीतर हिंदू संघटनांमुळे हे झाले अरे बाबा नो अप्गानिस्तान ,पाकीस्थान ,बाग्लादेश ,आज आपल्या पासून वेगळे होण्याची भाषा बोलणार्या आसाम, नागाल्यान्ड पुर्वोत्रीत राज्य काही हिंदू संघटनांमुळे हि परिस्थती झाली नाही हे सर्व सुनियोजित षड्यंत्र आहे हिंदू ज्या ठिकाणी अल्पसंख्याक झाला त्याच ठिकाणी कसा हा विचार निर्माण होतो हे लक्षात घेण्याची गरज आहे आज राज्याच्या सरकारने ,प्रशासनाने जम्मूत हिंदुना मारण्याचा व तेथून हाकलून लावण्याचे षड्यंत्र केले आहे आणि छोट्या मोठ्या प्रमाणात हे देशभरात होत आहे आज हेद्राबाद मलेगॉन ,भिवंडी इ.मध्ये आज मुस्लिम वस्ती जवळ पूर्वीपासून तेथे राहणारे बिगर मुस्लिम लोक आपले घर जमीन स्वस्थात विकून सुरक्षित जागी वसत आहे माझ्या धर्मनिर्पेश लोकानो करोडो कश्मीरी पंडित आज आपले गाव सोडून निर्वासित झाले आहे हे नुकसान फक्त आणि फक्त येथील हिंदूंचे झाले आहे असे नको व्हावे कि पूर्ण देशात हिंदू अल्पसंख्याक होऊन जाईल मग चूक सुधारण्यास पण वेळ मिळणार नाही ….

close