‘मेड इन इंडिया’, INS विक्रांतचं जलावतरण

August 12, 2013 2:01 PM0 commentsViews: 1004

12 ऑगस्ट : भारतीय बनावटीची विमानवाहू नौका आयएनएस (INS) विक्रांतचं आज जलावतरण झालं. INS विक्रांतच्या निर्मितीमुळे स्वबळावर विमानवाहू युद्धनौका बनवणारा भारत जगातला चौथा देश बनलाय. संरक्षणमंत्री ए के अँटनी यांच्या हस्ते या युद्धनौकेचं जलावतरण झालं. 2016 मध्ये या नौकेची चाचणी सुरु होणार असून 2018 मध्ये ही नोका नौदलात सामील होणार आहे. मिग-29 के, लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट ही विमानं आयएनएस विक्रांतवरून उड्डाण करू शकणार आहेत.

close