पैसे दिले नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या

August 12, 2013 1:25 PM0 commentsViews: 749

nagpur murder12 ऑगस्ट : वडील पैसे देत नाही म्हणून पोटच्या मुलाने जन्मदात्याच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली. शहरातील करोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्राध्यापक हरीश वासनीक यांची हत्या करणात आली. या प्रकरणी त्यांचा मुलगा अक्षय याला अटक करण्यात आलीय.

वडील पैसे देत नसल्याच्या कारणास्तव पोटच्या मुलानंच वडीलांच्या डोक्यात खलबत्ता घालून त्यांची हत्या केलीय. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलंय. हरीश यांचं मानकापूर इथं मेडिकलच दुकान आहे. मुलगा आणि त्यांची पत्नी दुकानातून घरी आले तेव्हा हरीश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.

त्यांची हत्या चोरीच्या उद्देशानं झाली असावी असा पोलिसांना संशय होता. पण तसं समोर न आल्यानं त्यांनी वेगळ्या दिशेनं तपास सुरू केला . चौकशी केली असता मुलानंच ही हत्या केल्याचं समोर आलंय.

close