विजय मल्ल्यांच्या बंगल्यावर बँकेचा ताबा

August 12, 2013 5:35 PM0 commentsViews: 804

vijay mallay12 ऑगस्ट : किंगफिशरचे किंग विजय मल्ल्या आता आणखीन अडचणीत आलेत. स्टेट बँक ऑफ इंडियानं विजय मल्ल्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाचा ताबा घेतला आहे.

किंगफिशर कंपनीकडे असलेल्या सहा हजार कोटी रूपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी बँकनं हा निर्णय घेतलाय. याशिवाय मल्ल्या यांच्या गोव्यातल्या बंगल्यावरही टाच आणली जाण्याची दाट शक्यता आहे.

या बंगल्याच्या लिलावातून मिळालेल्या पैशानं थकबाकीची रक्कम फेडली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून किंगफिशर एअरलाईन डबघाईला आली आहे.

close