रिक्षाचालकांची 3 दिवस बंदची हाक

August 12, 2013 7:10 PM0 commentsViews: 267

mumbai auto rikshaw12 ऑगस्ट : मुंबईत पुन्हा एकदा रिक्षा संपाने डोकवर काढलं आहे. कामगार नेते शरद राव यांनी रिक्षा संपाची हाक दिली आहे. 21 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून तीन दिवस रिक्षाचालकांचा संप असणार आहे. मुंबईत 1 लाख पाच हजार रिक्षाचालक आहेत.

रिक्षाचं भाडं वाढवून मिळावं आणि इतर मागण्यांसाठी हा संप केल्या जाणार आहे अशी माहिती शरद राव यांनी दिली आहे. सध्या मुंबईत रिक्षाच किमान भाडं हे 15 रुपये आहे तर मध्यरात्रीनंतर 19 रूपये आहे. वाढत्या महागाईचं कारण देऊन पुन्हा एकदा भाडेवाढीसाठी रिक्षा चालकांनी तब्बल 3 दिवसांचा संप पुकारला आहे.

close