‘लश्कर’ चा कमांडर ठार

January 28, 2009 6:21 AM0 commentsViews:

28 जानेवारी, बारामुल्लालश्कर-ए-तोयबा तोयबाचा कमांडर अबू हमजा लष्करी चकमकीत मारला गेला आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टमाईंड म्हणून त्याच्याकडे बोट दाखवण्यात येत होतं. हमजा लष्कर -ए-तोयबाचा स्थानिक कमांडर होता. अनेक दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार भागात लष्करानं ही कारवाई केली. या वेळी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे तर तीन जवान जखमी झाले आहेत.चकमक अजूनही सुरूच आहे बारामुल्लामधील सोपामध्ये दहशतवादी लपून बसल्याची खबर लष्कराला मिळाली होती. त्यावर त्वरित कारवाई करत अतिरेक्यांना पकडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अतिरेक्यांनी आक्रमक पवित्रा घेत लष्करावर गोळीबार सुरू केला. मात्र बहादूर जवानांनी त्याला ठोक उत्तर देत अबू हमजाला ठार केलं. 26/11 नंतर भारतीय लष्करानं हमजाभोवतीचा पाश आवळत आणला होता. त्याला पकडण्यासाठी युद्दपातळीवर प्रयत्न केले होते. त्याच प्रयत्नांमुळे हमजाचा खातमा करण्यात लष्कर यशस्वी झालं. भारतीय लष्कराच्या दहशतवाद विरोधी मोहिमेचं मोठं यश मानलं जात आहे.

close