पोलिसांनी घेतला H1N1चा धसका

August 12, 2013 8:06 PM0 commentsViews: 253

12 ऑगस्ट : औरंगाबाद पोलीस दलामध्ये सध्या H1N1 अर्थात स्वाईन फ्लुची भीती पसरलीय. पोलीस आयुक्त कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांना H1N1ची लागण झाल्यानं आयुक्तालयातील पोलीस कर्मचार्‍यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आयुक्तालयातील सर्व कर्मचारी तोंडाला मास्क लावून काम करत आहे. या दोनही कर्मचार्‍यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 30 कर्मचार्‍यांच्या स्वॅप चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

close