आमदारांनी बळकावली म्हाडाची घरं !

August 12, 2013 8:49 PM1 commentViews: 888

उदय जाधव,मुंबई

12 ऑगस्ट : मुंबईत म्हाडाच्या वर्सोवा इथल्या राजयोग सोसायटीत आमदारांसाठी घरं देण्यात आलीत. पण ज्या आमदारांची मुंबईत घरं नसतील अशाच आमदारांना ती देण्यात यावीत असा म्हाडाचा नियम आहे. पण हा नियम सत्ताधारी काँग्रेसच्या तीन आमदारांनी धाब्यावर बसवून, बेकायदेशीरपणे घरं मिळवली.

मंुबईतल्या वर्सोवातल्या म्हाडाची राजयोग सोसायटी..या सोसायटीत आत्तापर्यंत दोनशे पंचवीस आमदारांना घरे मिळाली. ही घरं देताना म्हाडाने या आमदारांना, मुंबईत घर नसल्याचा पुरावा सादर करायला सांगितलं होतं. पण सत्ताधारी काँग्रेसच्या तीन आमदारांनी खोटे पुरावे सादर करून, राजयोग सोसायटीत घरं बळकावलीयत.

घरं बळकावणारे आमदार
आमदार                    फ्लॅट क्रमांक
शालिनीताई पाटील    B 1403
जगन्नाथ शेट्टी         2A 1101
चरणसिंग सप्रा          2D 902

माहितीचा अधिकारात ही बाब उघड झालीय. शालिनीताई पाटलांनी हा आरोप फेटाळलाय. इतर दोन आमदारांनी मात्र या विषयावर बोलायला नकार दिला. म्हाडाची घरे बळकावण्यासाठी ज्या आमदारांनी खोटे पुरावे सादर केलेत. त्याच आमदारांनी निवडणूक आयोगाची देखिल फसवणूक केलीय. त्यामुळे कायदे मोडणार्‍या या आमदारांवर कोण कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  • Shankar Nikam

    These are MLA already imfamous for that.

close