लग्न करून दागिने पळवणारा ‘लखोबा लोखंडे’

August 12, 2013 11:09 PM0 commentsViews: 612

शैलेश तवटे, नवी मुंबई
12 ऑगस्ट : अनेक स्रीयांशी लग्न करून त्यांना फसवणारं लखोबा लोखंडे नावाचं पात्र अभिनेते प्रभाकर पणशिकरांनी गाजवलं होतं. माणसाची व्यक्तीरेखा अभिनेते प्रभाकर पणशिकरांनी यांनी लखोबा लोखंडे हे पात्र गाजवलं..अशाच एका लखोबा लोखंडेनं सध्या नवी मुंबईमध्ये उच्छाद मांडलाय.

महिलांशी जवळीक साधायची…त्यांच्याशी लग्न करायचं..त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे..आणि नंतर त्यांचे दागिने आणि रक्कम घेऊन पसार व्हायचं..’ही तो मी नव्हेच..’ या गाजलेल्या नाटकातली लखोबा लोखांडेची कथा नसून.नवी मुंबईतल्या संतोष वाळूज उर्फ प्रणव या ठगाचं आरोपपत्र आहे.

आपण कस्टम अधिकारी आहोत, सीआयडीत आहोत किंवा नेव्हीचे अधिकारी आहोत अशा कहाण्या सांगून या नवी मुंबईतल्या लखोबाने 7 स्त्रियांचं आयुष्य उध्वस्त केलं. अशाच 3 महिलांनी धाडस दाखवून पोलिसांत तक्रार केली आणि या प्रकरणाला वाचा फुटली.

संतोष वाळूजने 7 पेक्षाही जास्त महिलांना फसवलं असल्याची शक्यता आहे. हा सिरियल वेडिंग चीटर आता फरार झालाय. याला वेळीच अटक झाली तर अनेक महिलांचं आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचणार आहे.

close