दंबुला वनडेत श्रीलंकेची खराब सुरूवात

January 28, 2009 6:36 AM0 commentsViews: 2

28 जानेवारी, श्रीलंकाभारत आणि श्रीलंके दरम्यान दंबुला इथं सुरु असलेल्या वन डे मध्ये श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आहे. मॅचच्या तिसर्‍याच बॉलवर ओपनर दिलशान रन आऊट झाला. पण त्यानंतर सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारा यांनी श्रीलंकेची इनिंग सावरली आहे. जयसूर्याने तर मुनाफ पटेल आणि ईशांत शर्माची पिटाई करत आक्रमक धोरण ठेवलंय. त्यापूर्वी आज भारताने टॉस जिंकून श्रीलंकेला पहिली बॅटिंग दिली. भारताचा ओपनर विरेंद्र सेहवाग दुखापतीमुळे मॅचमध्ये खेळू शकला नाही. त्याच्याजागी रोहित शर्माला संधी मिळाली आहे.

close