कोल्हापुरात बलात्कार प्रकरणाचे पडसाद, जमावाकडून दगडफेक

August 13, 2013 2:25 PM0 commentsViews: 1117

kol563644364313 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये बोंद्रेनगर भागात अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय. आरोपी तरूण झारखंडचा राहणारा आहे.

त्यामुळे संतप्त मनसे-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांच्या घरावर हल्ले केले. परप्रांतीयांना बेदम मारहाण केली. या प्रकरणाचे पडसाद आजही उमटले. संतप्त नागरिकांनी आज रास्ता रोको केला.

मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. जमावातल्या काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

close