आमदारकीत योगेश सागर टॉपर तर 6 आमदारांविरुद्ध गंभीर गुन्हे

August 13, 2013 2:01 PM0 commentsViews: 1222

mla report card13 ऑगस्ट : ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिलं त्या प्रतिनिधींची पाच वर्षांतली कामगिरी कशी होती याचं रिपोर्ट कार्ड प्रजा फाऊंडेशननं जाहीर केलय. या रिपोर्टनुसार भाजपचे आमदार योगेश सागर यांनी सर्वोत्कृष्ट आमदाराचा बहुमान पटकावलाय. चांगल्या आमदारांच्या यादीत सागर यांनी पहिला क्रमांक पटकावलाय.

तर त्यांच्या पाठोपाठ स्वच्छ प्रतिमेचे आमदार म्हणून रमेशसिंग ठाकूर, अमिन पटेल, बलदेव खोसा पुढे आले आहे. तसंच लोकप्रिय आमदारचा बहुमान सरदार तारासिंग, रमेशसिंग ठाकूर, गोपाळ शेट्टी आणि मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांना हा किताब मिळालाय. तर या रिपोर्टची दुसरी बाजू अशी की, मुंबईतल्या सहा आमदारांविरूद्ध गंभीर स्वरूपाचे तर 11 आमदारांविरूद्ध किरकोळ स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आलेत.

मुंबईत एकूण 36 आमदार आहेत, त्यातल्या 32 आमदारांच्या कामगिरीचा आढवा यात घेण्यात आलाय. त्यातले 4 जण मंत्री असल्यानं त्यांना या पाहणीतून वगळण्यात आलंय.या पाहणीत भाजपचे आमदार योगेश सगर यांनी पहिला क्रमांक मिळवलाय. चांगली कामगिरी करणार्‍या पहिल्या दहा आमदारांमध्ये भाजपचे – 2, शिवसेनेचे 2, काँग्रसचे 5 आणि मनसेच्या 1 आमदाराचा समावेश आहे.

आमदारांचं रिपोर्ट कार्ड
– पहिला क्रमांक – योगेश सागर, भाजप
– स्वच्छ प्रतिमेचे आमदार – रमेशसिंग ठाकूर, अमिन पटेल, बलदेव खोसा
– लोकप्रिय आमदार – सरदार तारासिंग, रमेशसिंग ठाकूर, गोपाळ शेट्टी आणि बाळा नांदगावकर
– सभागृहात प्रश्न न विचारणारे आमदार – बलदेव खोसा

close